प्रेमानंद महाराजांना कसे भेटायचे? जाणून घ्या...

प्रेमानंद महाराजांचे देशभरात लाखो भक्त आहेत.

मागील काही वर्षांपासून वृंदावनमधील प्रेमानंद महाराज खूप लोकप्रिय झाले आहेत. भारतात त्यांचे लाखो भक्त आहेत. 


फक्त सामान्य लोकच नाही, तर अनेक सेलिब्रिटी आणि नेतेदेखील त्यांच्या सत्संगाला उपस्थित राहतात.


तुमच्यापैकी अनेकांची प्रेमानंद महाराजांना भेटण्याची आणि बोलण्याची इच्छा असेल. 


प्रेमानंद महाराजांना कसे भेटायचे, हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 


प्रेमानंद महाराज दररोज रात्री २:३० वाजता राधाकेली कुंजजवळील त्यांच्या आश्रमात येतात.


हे आश्रम वृंदावनातील इस्कॉन मंदिराजवळील परिक्रमा रोडवर आहे.


प्रेमानंद महाराज दररोज त्यांच्या निवासस्थानापासून आश्रमात चालत जातात.


तुम्हाला प्रथम टोकन घ्यावे लागेल, आश्रमात सकाळी ९:३० वाजता टोकन दिले जाते.


टोकन मिळाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ६:३० वाजता आश्रमात पोहोचावे लागेल.

तिथे तुम्ही सुमारे १ तास प्रेमानंद महाराजांचे दर्शन घेऊ शकता, त्यांना बोलू शकता आणि तुमच्या मनातील प्रश्न विचारू शकता.

Click Here