'या' दिशेला तोंड करुन चुकून गणपतीची मूर्ती ठेवू नका!

गणपतीची मूर्ती बसवताना लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी, जाणून घ्या...

ज्याच्या केवळ नावाने एक चैतन्य, उत्साह आणि सकारात्मक ऊर्जा संचारते, ती म्हणजे गणपती देवता.

गणपती बाप्पााच्या आगमनाला आता अवघे काही दिवस उरले आहेत. गणेश चतुर्थीचा उत्सव जसजसा जवळ येतोय. तशी बाप्पाच्या आगमनाची उत्सुकता वाढत चालली आहे.

गणेशोत्सव साजरा करताना केवळ सजावटच नव्हे तर मूर्तीची दिशा, स्थापना आणि विसर्जन याकडे लक्ष देणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

 योग्य दिशेला बाप्पा बसवल्यास भक्तांच्या आयुष्यात सुख-शांती आणि यश प्राप्त होतं, असं मानलं जातं.

गणपतीची मूर्ती कोणत्या दिशेला तोंड करुन ठेवावी, याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात.

गणपतीची मूर्ती दक्षिण दिशेकडे तोंड करून बसवू नये. कारण, ही दिशा शुभ मानली जात नाही. 

मूर्ती उत्तर, ईशान्य, पूर्व किंवा पश्चिम या दिशांना तोंड करून ठेवावी. 

तसेच, घरात गणपतीची मूर्ती किंवा फोटो ठेवताना, मूर्तीची सोंड डावीकडे वळलेली असावी. कारण ती अधिक शुभ आणि समाधान देणारी मानली जाते. 

Click Here