नारळी पौर्णिमा - समुद्र देवतेची पूजा
कोळी बांधवांकडून समुद्राला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो

सणाची ओळख
श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनासह नारळी पौर्णिमेचा उत्सव महाराष्ट्र, दक्षिण आणि उत्तर भारतात साजरा होतो.

कोळी बांधवांसाठी महत्व
नारळी पौर्णिमेच्या दिवशी कोळी बांधव समुद्र देवतेची पूजा करून नारळ अर्पण करतात.

पूजा आणि श्रद्धा
श्रावण पौर्णिमेला पूजा केल्याने समुद्रदेव प्रसन्न होतो व संकटांपासून रक्षण करतो, असा विश्वास आहे.

विशेष योग
श्रावण सोमवारी नारळी पौर्णिमा, संस्कृत दिवस, राखी पौर्णिमा आणि गायत्री जयंती असते हा दुर्मीळ योग आहे.

भगवान शंकराची पूजा
 नारळाचे तीन डोळे हे त्रिनेत्रधारी शंकराचे प्रतीक; या दिवशी शंकराला नारळ अर्पण करतात.

उत्सवाची तयारी
कोळी बांधव जाळी दुरुस्त करतात, बोटी रंगवतात आणि नवीन जाळी तयार करतात.

पारंपरिक अन्न
नारळी भातासारखे नारळ वापरून बनवलेले पारंपरिक पदार्थ तयार केले जातात.

जलयात्रा आणि नृत्य
सुशोभित बोटीने समुद्रात जाऊन परत आल्यावर कोळी बांधवांकडून नृत्य आणि गाण्यांचा आनंद घेतात.

सणाचा संदेश
नारळी पौर्णिमा हे सुख, आनंद आणि समृद्धीचे प्रतीक आहे.

Click Here