उंच डोंगराच्या कुशीत वसलेले हजारो वर्षांपूर्वीचे भीमाशंकर मंदिर
भीमाशंकर हे भारतातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग.
मंदिराचा इतिहास आणि वास्तुरचना हेमाडपंती शैलीतील हे मंदिर 1200-1400 वर्षांपूर्वीचे असून, छतावर व खांबांवर सुंदर नक्षीकाम आहे. दशावतार मूर्ती हे खास आकर्षण.
ऐतिहासिक आठवणी छत्रपती शिवाजी महाराज, राजाराम महाराज आणि पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनी येथे दर्शन घेतले. नाना फडणवीसांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला.
भीमाशंकर अभयारण्य १३०.७४ चौ.किमी मध्ये पसरलेले हे अभयारण्य 1985 मध्ये जाहीर झाले. येथे बिबट्या, रानमांजर, सांबर यांसारखे प्राणी आढळतात.
गुप्त भीमाशंकर मंदिरापासून दीड किमी अंतरावर गुप्त भीमाशंकर आहे जिथे भीमा नदी प्रकट होते. येथे जंगलातून चालत जावे लागते.
कळमजाई मंदिर कळमजाई देवी हे जागृत स्थान आहे. भीमाशंकरच्या दर्शनानंतर येथे जाणे महत्त्वाचे मानले जाते.
कोकण कडा आणि नागफणी कोकणकडा हे विहंगम दृश्य देणारे ठिकाण आहे. नागफणी हे सर्वात उंच ठिकाण असून समुद्रसपाटीपासून 1230 मीटरवर आहे
हनुमान तळे आणि अंजनी माता मंदिर पुरातन हनुमान मंदिरासमोर पाण्याचे मोठे तळे आहे. हे तळे वर्षभर पाण्याने भरलेले असते.
भाका देवी – नवसाची देवी भाका देवी (भाषा देवी) ही बोलायला न येणाऱ्या लहान मुलांसाठी नवसाची देवी मानली जाते. ही जागा जंगलात मोकळ्या मैदानात आहे.