जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...
मेष - आज नोकरीत वरिष्ठां बरोबर महत्वाच्या विषयावर चर्चा होऊन आपण आखलेल्या योजनेला सरकार कडून फायदा होईल.
वृषभ - आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. व्यापारी आपल्या व्यापारात भांडवल घालून नवीन कामे सुरू करतील.
मिथुन - आज कोणत्याही प्रकारच्या संकटा पासून बचाव होण्यासाठी रागावर नियंत्रण ठवावे लागेल.
कर्क - आजचा दिवस मित्र व स्वकियांच्या सहवासात आपण आनंदात घालवाल. मनोरंजनातून आनंद मिळेल.
सिंह - आज घरात हर्ष व आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवाल. शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील.
कन्या - आजचा दिवस चिंता व उद्विग्नपूर्ण असून या ना त्या कारणाने काळजी वाढवेल. विशेषतः संतती व आरोग्य विषयक जास्त चिंता वाटेल.
तूळ - आज शारीरिक थकवा व मानसिक दृष्टया आपण व्यस्त राहाल. माते विषयी चिंता राहील.
वृश्चिक - आजचा दिवस आपण खुशीत घालवाल. नवीन कामाची सुरुवात कराल. घरात भावंडांशी सलोख्याचे संबंध राहतील.
धनु - आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. वायफळ खर्च होतील. मनास मरगळ येईल. कुटुंबीयांशी गैरसमज झाल्याने मनस्ताप होईल.
मकर - आज नियोजीत काम व्यवस्थित पार पडेल. कार्यालय वा कामाच्या ठिकाणी आपले वर्चस्व वाढेल.
कुंभ - आज कोणाला जामीन राहणे, पैसे देणे - घेणे करू नका. खर्च वाढेल. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल.
मीन - आजचा दिवस लाभदायक आहे. नोकरी - व्यवसायात उत्पन्न वाढेल. वडीलधारी व मित्रांकडून लाभ होईल.