कसा असेल तुमचा आजचा दिवस... काय सांगते तुमची राशी...
आजचा दिवस आनंदोत्सव साजरा करण्याचा आहे. दिवस शारीरिक व मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने चांगला जाईल.
स्नेही व नातलग ह्यांच्याशी मतभेद झाल्याने घरात विरोधी वातावरण निर्माण होईल. कामे अपूर्ण राहतील.
आज कुटुंबात खुशीचे, आनंदाचे वातावरण राहील. नोकरी - व्यवसायात लाभाच्या बातम्या मिळतील.
आज नोकरीत वरिष्ठांच्या प्रोत्साहनाने आपला उत्साह द्विगुणित होईल. पगारवाढ किंवा पदोन्नती झाल्यास आश्चर्य वाटायला नको.
मंगल कार्यात आपल्या स्नेहीजनांसह सहभागी व्हाल. कर्तव्यनिष्ठ राहून हाती घेतलेले काम तडीस नेण्याचा प्रयत्न कराल.
मनावर संयम ठेवावा लागेल. स्वभावांतील उग्रतेमुळे मतभेद होण्याची शक्यता आहे. हितशत्रू विघ्न उपस्थित करतील.
प्रिय व्यक्तीच्या सहवासामुळे आनंदी राहील. एखादी सहल संभवते. मनोरंजनाची साधने व वस्त्रालंकार यांची खरेदी होईल.
कुटुंबीयांसह आनंदात वेळ घालवू शकाल. शारीरिक स्वास्थ्य व मानसिक प्रसन्नता अनुभवाल.
कार्यातील अपयश मनात नैराश्य निर्माण करील व त्यामुळे संताप वाढेल. पण हा राग नियंत्रणात ठेवल्यास गोष्टी जास्त चिघळणार नाहीत.
प्रतिकूलतेस तोंड द्यावे लागेल. घरगुती क्लेश मनाला यातना देतील. आईची प्रकृती मनात चिंता उत्पन्न करेल.
आज आपणास मोकळेपणा जाणवेल. शारीरिक स्वास्थ्य आपला उत्साह वाढवेल. शेजारी व भावंडांशी सौहार्दाचे संबंध प्रस्थापित होतील.
आज खर्च, संताप व जीभ यावर संयम ठेवावा लागेल. कोणाशी भांडण होण्याची शक्यता आहे.