आजचे राशीभविष्य,
६ ऑक्टोबर २०२५

कसा असेल तुमचा आजचा दिवस... काय सांगते तुमची राशी?

आज शारीरिक व मानसिक अस्वास्थ्याचा अनुभव येईल. सर्दी, खोकला, ताप इत्यादींचा त्रास होईल.

आज आपली प्राप्ती व व्यापार ह्यात वाढ होईल. व्यापारात नवीन लाभदायक संपर्क वाढतील.

शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल. नोकरी - व्यवसायात आपल्या श्रमाचे चीज होत आहे असे वाटेल.

आज आरामदायी दिवस आहे. प्रत्येक काम सहज पूर्ण होईल. नोकरीत वरिष्ठ खूश असतील. बढती मिळू शकते. 

दिवस मनोरंजन व हिंडण्या - फिरण्यात घालवाल. तरीही प्रापंचिक विषयाकडे आपला व्यवहार उदासीनच असेल.

सामाजिक व अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल. उंची वस्त्रे व अलंकाराची खरेदी होईल. वाहनसौख्य मिळेल.

भिन्नलिंगी व्यक्तीचा तुमच्या जीवनावर पगडा असेल. नवीन वस्त्र खरेदी कराल. 

आरोग्य विषयक चिंता निर्माण होईल. संतती विषयक समस्या निर्माण होतील. मानभंग होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल.

कौटुंबिक वातावरण क्लेशदायक असेल. कुटुंबीयांशी मतभेद होऊ शकतात. स्थावर मिळकतीचे व्यवहार करताना सावध राहावे. 

नवीन कार्यारंभासाठी तयार राहावे लागेल. सफलता मिळेल. प्रत्येक काम जीव लावून कराल. व्यापार - व्यवसायात लाभ होईल. 

द्विधा मनःस्थितीमुळे कोणताही ठोस निर्णय आपण घेऊ शकणार नाही. महत्वाचे निर्णय आज घेऊ नका. 

दिवस आनंद व उत्साहाने परिपूर्ण राहील. घरात एखादे मंगल कार्य ठरेल. नवे काम आरंभ करण्यास दिवस अनुकूल आहे.

Click Here