जाणून घ्या, काय सांगते तुमची राशी...?
आज आपण एखाद्या अडचणीत सापडू शकता. नोकरीत इतरांशी प्रेमाने वागून कार्य पूर्ण करून घ्या. वाद संभवतात. नशिबाची साथ मिळणार नाही.
आज आपण हळवे व्हाल व त्यामुळे आपणास बेचैनी जाणवेल. शारीरिक स्वास्थ्यावर सुद्धा त्याचा नकारात्मक परिणाम होईल. नवे कार्य आज सुरू करू नका.
आजचा दिवस सौख्यदायी आहे. मात्र, आपण दिवसभर आपली दैनंदिन कामेच करत राहाल. मन प्रसन्न राहण्यासाठी आपण मनोरंजनाचा आधार घ्याल.
आज व्यावसायिक वातावरण आपणास अनुकूल राहील. स्त्रियांना माहेरहून आनंददायी बातमी मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल.
आजचा दिवस प्रणयाराधनेसाठी अनुकूल आहे. रागावर नियंत्रण ठेवा. पोटाच्या व्याधी त्रास देतील. दुपार नंतर घरात आनंद- उत्साहाचे वातावरण राहील.
आज शारीरिक स्वास्थ्य, मानसिक तरतरी व चेतना शक्तीचा अभाव राहील. सामाजिक स्तरावर मानहानी संभवते. धनहानी सुद्धा संभवते.
आजचा दिवस नवे कार्य हाती घेण्यास अनुकूल आहे. प्रिय व्यक्तीच्या भेटीने आनंद होईल. भाग्योदय होईल. समाजात मान- सन्मान मिळतील.
नियोजित काम पूर्ण न झाल्याने नैराश्य येईल. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे आज टाळावे. घरगुती वातावरण क्लेशदायी राहील.
आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नियोजित कामे पूर्ण होऊन धनप्राप्ती होईल. शारीरिक व मानसिक दृष्टया उत्साहित व ताजेतवाने राहाल.
आज कोणाला जामीन राहू नये, अन्यथा अडचणीत सापडाल. अपघाताची शक्यता असल्याने वाहन जपून चालवावे लागेल.
आजचा दिवस लाभदायी आहे. आर्थिक व सामाजिक क्षेत्रांत प्रगती होईल. नवीन परिचय होतील. परंतु दुपार नंतर प्रकृती बिघडेल.
आज नोकरीत वरिष्ठांकडून लाभ होतील. पदोन्नती संभवते. आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक पातळीवर सुद्धा लाभ संभवतात.