धनलाभाचा योग्य; भिन्नलिंगी व्यक्तीमुळे संकटात सापडाल

आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५

आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. गुप्तशत्रूंचा त्रास संभवतो. रहस्यमय व गूढ विषयांचे आकर्षण राहील. शक्यतो प्रवास टाळा. नवीन कार्ये हाती घेतल्यास त्यात सुद्धा अडचणी येतील.

आजचा दिवस शुभ फलदायी आहे. प्रकृती उत्तम राहील.  परदेशातून मनासारख्या बातम्या येतील. वैवाहिक जीवनात गोडी राहील. अचानक धनलाभ संभवतो.

आजचा दिवस अपूर्ण कामे पूर्णत्वास जाण्याच्या दृष्टीने अनुकूल आहे. कुटुंबात हर्षोल्हासाचे वातावरण राहील. धनप्राप्ती होईल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. नोकरीत लाभ होतील.

आजचा दिवस अगदी शांत राहून घालवावा लागेल. खर्च उदभवतील. प्रणयी जीवनात वाद होऊन मतभेद होतील. भिन्नलिंगी व्यक्तींकडे आकर्षित झाल्याने एखाद्या संकटात सापडाल.

आज मानसिक अस्वस्थता जाणवेल. कुटुंबीयांशी मतभेद होतील. जमीन, घर अथवा वाहनाची खरेदी किंवा खरेदीपत्र करण्यास आजचा दिवस अनुकूल नाही. नोकरीत स्त्री वर्गा पासून जपून राहा.

विचार न करता कोणतेही साहस करू नका. गूढ व रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील. एखाद्या विषयात प्रावीण्य प्राप्त होईल. विरोधक व प्रतिस्पर्धी ह्यांचा जोमाने प्रतिकार करावा लागेल.

आज आपला हट्टीपणा सोडून समाधानी वृत्तीने काम करावे. द्विधा स्थितीत अडकलेले मन कोणताही ठोस निर्णय घेऊ देणार नाही. आज शक्यतो महत्त्वाचा निर्णय घेऊ नये.

आजचा दिवस शुभ फलदायी आहे. शारीरिक व मानसिक प्रसन्नता वाटेल. प्रिय व्यक्तीशी सुसंवाद साधण्यात यश मिळेल. मंगल कार्याला उपस्थिती लावाल. धनलाभ व प्रवास संभवतात.

आजचा दिवस समस्याग्रस्त आहे. कुटुंबीयांशी चर्चा होईल व दुःखी व्हाल. वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. एखादा अपघात संभवतो. शारीरिक स्वास्थ्य बिघडेल. पैसा खर्च होईल.

आजचा दिवस प्रत्येक गोष्टीत लाभदायक आहे. मित्रांची भेट होईल. व्यापार्‍यांची व्यापारात व नोकरदारांची नोकरीत प्राप्ती वाढेल. कौटुंबिक जीवनात आनंद राहील. नव्या वस्तूंची खरेदी होईल.

आज प्रत्येक काम सरळपणे होऊन त्यात यश सुद्धा मिळेल. नोकरी - व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. बढती व धनप्राप्ती संभवते. कौटुंबिक जीवन आनंदी राहून मान - प्रतिष्ठा वाढेल.

दिवसाची सुरवात भीती व उद्विग्नतेने होईल. कोणतेच काम पूर्ण न झाल्याने नैराश्य येईल. कार्यालयात वरिष्ठांशी मतभेद होतील. संतती हे चिंतेचे कारण राहील. अकारण पैसा खर्च होईल.

चाणक्य नीतिः या ५ प्रकारच्या लोकांवर कधीही विश्वास ठेवू नका

Click Here