आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: नवीन कार्यारंभ करू शकाल

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...काय सांगते तुमची राशी...

मित्रांकडून भेटवस्तू मिळतील. तसेच आपल्याला सुद्धा त्यांच्यासाठी खर्च करावा लागेल. नवीन मित्रांमुळे भविष्यात लाभ होतील.

नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल. वरिष्ठांची आपणावर मर्जी राहील. पदोन्नती पण मिळू शकेल. वैवाहिक जीवनात माधुर्य वाढेल

नोकरी - व्यवसायात सहकारी व वरिष्ठांचे सहकार्य न मिळाल्याने मानसिक दृष्टया निराश व्हाल. संतती विषयक समस्या निर्माण होतील

आज वैचारिक नकारात्मकता मनात असल्याने दिवसभर आपण अस्वस्थ राहाल. रागावर आज संयम ठेवावा लागेल. खर्च अधिक होईल

आजचा दिवस आपण मनोरंजन व हिंडण्या - फिरण्यात घालवाल. तरीही प्रापंचिक विषयाकडे आपला व्यवहार उदासीनच असेल

कुटुंबातील शांती - सुखाचे वातावरण मनाला प्रसन्ना देईल. आर्थिक लाभ व कामात यश मिळेल. आजारातून मुक्त व्हाल. नोकरीत फायदा होईल.

आज कल्पनाशक्ती व सृजनशक्ती यांचा चांगला उपयोग आपण कराल. संततीची प्रगती होईल. प्रिय व्यक्तीचा सहवास आनंददायी ठरेल.

आज शारीरिक व मानसिक दृष्टया भीतीचा अनुभव आपण घ्याल. आज चिंता सतावेलच. कुटुंबीय, नातलग व संबंधित यांच्याशी पटणार नाही

आज आपल्यावर गूढ व रहस्यमय विद्येचा विशेष प्रभाव राहील. त्याचा अभ्यास व संशोधन यांत गोडी राहील. मन शांत व प्रसन्न राहील.

कुटुंबियांशी गैरसमज झाल्याने मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. आरोग्याकडे लक्ष द्या. शेअर सट्टा यांत पैसे गुंतविण्याचे नियोजन कराल

आर्थिक दृष्टया लाभदायक दिवस आहे. आप्तेष्ट व मित्र यांच्यासह रुचकर व स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल. एखाद्या पर्यटनाचा बेत ठरवाल

आज आपल्या मनाची एकाग्रता राहिल्यामुळे मानसिक व्यग्रता जाणवेल. मंगल कार्यावर खर्च होईल. स्वकीयांपासून दूर जावे लागेल

Click Here