आजचे राशीभविष्य, २४ नोव्हेंबर २०२५
मानसिक व्यग्रता व मनाची बेचैनी ह्यामुळे आपले कामात लक्ष लागणार नाही.
योग्य आहार घ्या. आज कामाचा व्याप वाढेल. शिथिलता राहील.
प्रकृती उत्तम राहील. वैवाहिक सुखाचा आनंद उपभोगता येईल.
कुटुंबियांसह आनंदात वेळ जाईल. नोकरीत लाभ होतील.
आजचा दिवस आनंददायी आहे. आज आपण अधिक कल्पनाशील बनाल.
स्वकियांशी खटके उडून मतभेद निर्माण होतील. पाण्यापासून धोका संभवतो.
शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडेल. काही अडचणींमुळे मन दुःखी राहील.
आजचा दिवस साधारणच आहे. वायफळ खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल.
आर्थिक लाभ होतील. सगेसोयरे व मित्रांच्या आगमनाने मन खुश होईल.
परोपकारी व्यवहार वाढतील. शत्रूंचा त्रास होईल. एखादी दुर्घटना संभवते.
कौटुंबिक जीवन व दांपत्य जीवन यात सुखा-समाधानाचा अनुभव येईल.
नोकरीत पदोन्नती मिळेल. व्यापार्यांची येणी वसूल होतील.