जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
मेष: मध्यम फलदायी दिवस. थकवा जाणवेल. शक्यतो प्रवास टाळावा. हट्टीपणा सोडून द्यावा. संततीची काळजी राहील. कामात यश लाभेल.
वृषभ: आजचा दिवस मध्यम फलदायी. लाभ संभवतात. वडील खूप चांगल्या रीतीने वागतील. खेळाडू व कलाकारांसाठी आजचा दिवस उत्तम आहे.
मिथुन: नवीन योजना अंमलात आणण्यास अनुकूल दिवस. नोकरीत वरिष्ठांकडून किंवा सरकारकडून परिश्रमाचा यथोचित मोबदला. नशीबाची साथ.
कर्क: गैरसमज व नकारात्मक व्यवहार मनात ग्लानी निर्माण करतील. कुटुंबियांशी मतभेद होतील. कामासंबंधी समाधानाची भावना निर्माण होईल. धन खर्च होईल.
सिंह: आज कोणत्याही कामासंबंधी आत्मविश्वासाने त्वरित निर्णय घेऊ शकाल. वडील व वडीलधार्यांचा सहवास लाभेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.
कन्या: अहंपणामुळे भांडण होण्याची शक्यता आहे. चिंतेत दिवस जाईल. स्वभावातील उतावळेपणामुळे काम बिघडण्याची शक्यता आहे.
तूळ: आजचा दिवस शुभ फलदायी व लाभदायी. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. नोकरी-व्यवसायात उत्पन्न वाढेल. व्यापारात विकासाच्या संधी मिळतील.
वृश्चिक: कौटुंबिक जीवनाची सार्थकता लक्षात येईल. घरात आनंदाचे वातावरण राहील. काम विनासायास पार पडेल. उत्पन्न वाढेल. प्रगतीचा मार्ग मोकळा.
धनु: आज प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. कामात उत्साह व आवेशाचा अभाव राहील. मन चिंतायुक्त राहील. संततीची समस्या हे त्याचे कारण असू शकते.
मकर: नकारात्मक विचार प्रभावी होऊ देऊ नका. भागीदारांशी संबंध बिघडतील. अचानक प्रवास करावा लागेल. खर्च करावा लागला. अचानक धनलाभ होईल.
कुंभ: आजचा दिवस प्रसन्नतेचा आहे. आत्मविश्वास वाढल्याने कामात यश मिळणे सहज शक्य होईल. प्रतिष्ठा वाढेल. स्वादिष्ट भोजन, वस्त्र व वाहनसुख मिळेल.
मीन: मनाचा खंबीरपणा व आत्मविश्वास काम यशस्वी करील. कुटुंबात सुख-शांती, आनंदाचे वातावरण राहील. नोकरीत वर्चस्व राहील. प्रतिस्पर्ध्यांवर विजय.