जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
मेष: संतोषाची भावना राहील. व्यवसायात लाभ, मान, प्रतिष्ठा मिळेल. नोकरीत बढती मिळेल. कामाच्या व्यापामुळे थकवा जाणवेल.
वृषभ: व्यापार्यांसाठी आजचा दिवस शुभ. आर्थिक लाभ प्राप्त होतील. दूरच्या प्रवासाची शक्यता. कामाचा व्याप उबग आणेल.
मिथुन: नकारात्मक विचारांपासून दूर राहणे हितावह राहील. शक्यतो नवीन कार्य सुरू करू नये. आर्थिक चणचण भासेल.
कर्क: आजचा पूर्ण दिवस आनंद, उत्साह, मनोरंजनात जाईल. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. वाहन सौख्य लाभेल.
सिंह: आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. कुटुंबियांशी बोलताना वाणीवर संयम ठेवावा. दैनंदिन कामात विघ्ने येतील.
कन्या: आज शक्यतो वाद व चर्चा ह्यापासून दूर राहणे हितावह राहील. अचानकपणे खर्चात वाढ होईल. मन आनंदित होईल.
तूळ: आज मानसिक थकवा जाणवेल. जास्त हळवे व्हाल. मनात उठणार्या विचार तरंगांमुळे त्रास होईल. मानसिक ताण येईल.
वृश्चिक: नवीन कार्याचा आरंभ करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. दिवसभर मन आनंदी राहील. आर्थिक लाभ संभवतात.
धनु: द्विधा मनःस्थिती, घरातील बिघडलेले वातावरण यामुळे त्रास होईल. नाहक खर्च होईल. कामे पूर्ण व्हायला विलंब लागेल.
मकर: आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. प्रत्येक काम सहजपणे पूर्ण होईल. मान - सन्मान होतील. नोकरीत बढतीची शक्यता.
कुंभ: आज आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. मानसिक अस्वस्थता जाणवेल. आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा. पैसा खर्च होईल.
मीन: आज आपण कौटुंबिक व सामाजिक सोहळ्यात सहभागी व्हाल. मित्रांचा सहवास घडेल. प्रत्येक क्षेत्रात फायदा होईल.