जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
मेष: खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. आर्थिक देवाण-घेवाण करताना सावध राहा. कोणाशी मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. मध्यम फलदायी दिवस.
वृषभ: दिवस शुभ फलदायी . रचनात्मक व कलात्मक क्षमता वाढेल. मन लावून काम कराल. आर्थिक जवाबदारी व्यवस्थित पार पाडाल. आर्थिक आयोजन कराल.
मिथुन: संयमशील व विचारपूर्ण वर्तन अनेक अनिष्ट गोष्टींपासून बचाव करू शकेल. वक्तव्याने गैरसमज निर्माण होतील. खर्च जास्त होईल.
कर्क: आजचा दिवस उत्साहात व आनंदात जाईल. व्यापारात लाभ होईल. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. मित्रांशी चर्चा झाल्याचा आनंद होईल. सौख्य लाभेल.
सिंह: खंबीर मन व दृढ निश्चयाने प्रत्येक कार्यात सुयश. व्यवसायात प्रगती. बढतीची शक्यता. लाभ होईल. धनाच्या दृष्टीने सरकारी कामे सफल होतील.
कन्या: दिवस शुभ फलदायी आहे. धर्मिक कार्य व प्रवासास आजचा दिवस अनुकूल आहे. विदेशातील स्नेह्यांकडून आनंददायी बातमी मिळेल. आर्थिक फायदा होईल.
तूळ: दिवस शुभ फलदायी असल्याने नवे कार्य हाती घेऊन त्यात यशस्वी होऊ शकाल. वक्तृत्व व कृती संयमित ठेवणे हितावह राहील. हितशत्रूंचा त्रास संभवतो.
वृश्चिक: दिवस काहीसा वेगळाच आहे. स्वतःसाठी वेळ काढू शकाल. रुचकर भोजन, वस्त्रालंकारांमुळे आनंदी राहाल. मान-सन्मानात वाढ. सौख्य लाभेल.
धनु: दिवस आर्थिक लाभाचा. नोकरीत लाभ व सहकार्यांचे सहकार्य मिळेल. कार्यात यश मिळेल. एखादी चांगली बातमी मिळेल. वाणीवर संयम ठेवावा.
मकर: मन चिंतातुर व द्विधा अवस्थेत राहील. खंबीरपणे निर्णय घेऊ शकणार नाही. नशिबाची साथ नसल्याने कोणतेही महत्त्वाचे काम न करणे हितावह राहील.
कुंभ: मानसिक तणावामुळे ग्रासून जाल. मनात एखादी आर्थिक योजना आखाल. पैसा खर्च होईल. लाभाची शक्यता. कोणत्याही गोष्टीत हट्टीपणा करू नका.
मीन: आजचा दिवस महत्त्वाचा निर्णय घेण्यास अनुकूल. विचारात दृढता राहील. कामे पूर्ण होतील. भावंडांकडून फायदा होईल. कामाचे यश मन आनंदी करेल.