जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
मेष: प्रतिकूलतेचा सामना करावा लागेल. विनाकारण खर्च वाढतील. गुंतवणूक करू शकाल. गूढ विषयांकडे कल होईल. लोभाच्या लालसेपासून दूर राहा.
वृषभ: आजचा दिवस आनंदाचा आहे. व्यापार व प्राप्तीत वाढ होईल. कुटुंबीय व मित्र यांच्यासह आनंदात राहू शकाल. नवे परिचय व्यापारात लाभप्रद होतील.
मिथुन: दिवस शुभ फलदायी. सामाजिक मान - मरातब वाढेल. बढतीची शक्यता. स्नेहीजनांकडून भेटवस्तू मिळतील. प्रापांचिक जीवन आनंदपूर्ण राहील.
कर्क: मांगलिक कार्यात सहभाग असेल. कुटुंबीयांसह वेळ आनंदात जाईल. मन चिंतामुक्त होईल. अचानक धनलाभ संभवतो. नशिबाची साथ लाभेल.
सिंह: खूप सावध राहावे लागेल. विपरित घटनांना तोंड द्यावे लागेल. अचानक खर्च करावा लागेल. कुटुंबियांशी संयमाने वागावे लागेल.
कन्या: आजचा दिवस अनुकूलतेचा. जोडीदारासोबत सुखद क्षणांचा आनंद घ्याल. सामजिक, सार्वजनिक मान- प्रतिष्ठा वाढेल. उत्तम भोजन प्राप्ती होईल.
तूळ: घरात आनंद व शांतीचे वातावरण राहील. सुखदायक घटना घडतील. कामात यश व सफलता मिळेल. नोकरीत यश मिळेल. आर्थिक लाभाची शक्यता.
वृश्चिक: घरगुती जीवनात शांतीचे व आनंदाचे वातावरण राहील. मित्र - मैत्रिणी भेटतील. चांगली बातमी समजेल. धनलाभ होईल व खोळंबलेली कामे मार्गी लागतील.
धनु: आज शक्यतो प्रवास टाळावा. कामे अयशस्वी झाल्याने नैराश्य येईल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. साहित्य व कला ह्या विषयांची गोडी निर्माण होईल.
मकर: मनःस्थिती चांगली राहणार नाही. परिवारात संघर्षामुळे वातावरण खिन्न बनेल. उत्साहाचा अभाव जाणवेल. शांत झोप मिळणार नाही. अडचणीत याल.
कुंभ: मोकळेपणा जाणवेल. मनातील चिंतेचे ढग दूर होतील. मनात उत्साह संचारेल. दिवस आनंदात जाईल. मित्र व नातेवाईक भेटतील. नशिबाची साथ.
मीन: आनंद, उत्साह व प्रसन्न यामुळे चैतन्य व स्फूर्तीचा संचार होईल. नवीन कामे हाती घ्याल. यश मिळेल. कुटुंबीयांसह मिष्ठान्नाचा आस्वाद घ्याल.