आजचे भविष्य, १९ ऑगस्ट: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग , प्रवास टाळा

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...

नवीन कार्य करण्याची प्रेरणा झाली तरी विचारात स्थिरतेचा अभाव असल्यामुळे काही बाबींत त्रास होईल. 

आज आपल्या मनाची दोलायमान अवस्था महत्वाच्या संधीपासून आपणाला दूर ठेवेल.

वस्त्रालंकार मिळवून तसेच मित्र व कुटुंबीय यांच्या सहवासामुळे मानसिक दृष्टया दिवस अत्यंत आनंददायी ठरेल.

आज कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उदभवतील व त्यामुळे मानसिक दृष्टया आपण अस्वस्थ राहाल.

स्त्रीया व मित्रवर्गाकडून लाभाची शक्यता आहे. रम्य स्थळी प्रवासाला जाल.

नव्या कार्याचे बेत तडीस जातील. व्यापारी व नोकरदारांसाठी दिवस अनुकूल आहे. 

आज आपण बुद्धिवादी व साहित्य प्रेमी यांच्या सहवासात ज्ञानाच्या चर्चेत वेळ घालवाल.

नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता असल्याने आज नवीन कामे सुरू न करणे हितावह राहील. 

भिन्नलिंगी व्यक्तीच्या सहवासात रमून जाल. दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल.

आर्थिक व्यवहार यशस्वीपणे होतील. घरातील वातावरण आनंदी राहील. योग्य ठिकाणीच पैसा खर्च होईल.

महिलांनी बोलण्यावर संयम ठेवावा. प्रवास शक्यतो टाळावेत. संतती विषयी काळजी राहील. 

कुटुंबात वाद संभवतात. आईचे स्वास्थ्य बिघडून चिंता निर्माण होईल. मन नाराज राहील. 

Click Here