आजचे राशीभविष्य,१६ डिसेंबर: धनलाभ अन् यश

जाणून घ्या, तुमचे आजचे राशीभविष्य...

मेष: सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रांत प्रसिद्धी मिळेल. सुख-समाधान मिळेल. मौज-मस्ती, मनोरंजनामुळे सहजीवनात लाभ होईल. 

वृषभ: कोणाची चेष्टा-गंमत करण्याच्या नादात भांडणाची स्थिती उद्भवेल. गैरसमज निर्माण होतील. मानसिक उन्मत्तपणा अधिक समस्या निर्माण करील.

मिथुन: वाद-विवाद, चर्चा ह्यात खोलात जाऊ नका. आत्मसन्मान दुखावला जाईल. खर्च व नुकसान होण्याची शक्यता आहे. 

कर्क: आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मिळेल. मतभेद वा भांडण होण्याची शक्यता आहे. धन खर्चाची व अपयशाची शक्यता आहे.

सिंह: आज शरीर व मन स्वस्थ व प्रफुल्लित राहील. ठरवलेली कामे पूर्ण होतील. प्रगतीच्या संधी चालून येतील. आर्थिक लाभ होईल. 

कन्या: नकारात्मक विचार बेचैनी वाढवतील. बौद्धिक चर्चा करताना भांडण होणार नाही याची दक्षता घ्या. व्यवसायात यश मिळेल.

तूळ: आज कलात्मक व सृजनात्मक शक्ती सर्वोत्तम राहील. दृढ विचार व आत्मविश्वासाने कामे पूर्ण कराल. भागीदारांचे विचार पटतील. 

वृश्चिक: हर्षोल्हास व मनोरंजनावर पैसे खर्च कराल. मानसिक चिंतेने त्रासून जाल. वाणीवर संयम नसल्याने भांडणतंटा होऊ शकतो. 

धनु: प्रेमाचा सुखद अनुभव मिळण्याचे सौभाग्य प्राप्त होईल. आर्थिक लाभ होईल. उत्पन्नाची साधने वाढतील. व्यापारात वाढ होईल.

मकर: व्यवसायात धन, मान व प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत कष्टाचे चीज होईल. नोकरीत बढती मिळेल. सरकारी कामात यश मिळेल. लाभ होतील.

कुंभ: अस्वास्थ्य जाणवेल. कामात उत्साहाचा अभाव राहील. कार्यालयात वरिष्ठांशी मतभेद होतील. तपरदेशगमनाची शक्यता वाढेल. 

मीन: काही प्रमाणात प्रतिकूलतेचा सामना करावा लागेल. संयमाने वागावे लागेल. अचानक धनलाभ. व्यापार्‍यांची जुनी येणी वसूल होतील.

Click Here