जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस
आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी आहे. धनलाभा बरोबरच दीर्घकालीन आर्थिक नियोजनही करू शकाल.
वाणीच्या प्रभावाने इतरांना मंत्रमुग्ध करून लाभ मिळवाल. नवीन संबंध जुळण्याची शक्यता आहे.
मानहानी होण्याची शक्यता आहे. मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता आहे.
पैसा खर्च होईल व कामात अपयश येईल. भोजन अवेळी होईल. निद्रानाशाचा त्रास होईल.
दूरस्थ व्यक्ती किंवा संस्था यांच्या बरोबरचे संबंध दृढ होतील की ज्यामुळे भविष्यात फायदा होईल.
प्रकृती उत्तम राहील. शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळावी. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल.
कुटुंबियांशी एखाद्या विषयावर वाद संभवतात. प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. विशेषतः डोळ्यांची निगा राखावी लागेल.
सांसारिक सौख्य मिळेल. विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील. व्यवसायात विशेष लाभ होतील. वरिष्ठांची आपल्यावर मर्जी राहील.
वैवाहिक जीवनाचा मनसोक्त आनंद उपभोगू शकाल. मित्रांसह रम्य ठिकाणी प्रवासास जाण्याचा बेत आखाल.
सृजनात्मक क्षेत्रात नवीन रचना क्षमतेचा परिचय करून द्याल. तरीही मानसिक स्वास्थ्य मिळणार नाही. संतती विषयक प्रश्न आपणाला दुःख देतील
मानसिक स्वास्थ्य मात्र उत्तम राहील. शरीरात स्फूर्तीचा अभाव असल्याने काम करण्यात उत्साह वाटणार नाही.
आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आजारपणावर अतिरिक्त पैसा खर्च होण्याची शक्यता आहे.