जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
मेष: संपूर्ण दिवस आप्तेष्टांसह हर्षोल्हासात घालवू शकाल. मान-सन्मान होतील. नव्या ओळखी विचारपूर्वक कराव्यात. खर्चात वाढ होईल.
वृषभ: आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी. कौटुंबिक वातावरण आनंदी. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. भागीदारांशी मतभेद संभवतात.
मिथुन: आजचा दिवस बौद्धिक कामे व चर्चा करण्यात जाईल. कल्पनाशक्तीस वाव मिळेल. व्यवसायात लाभ संभवतो. कुटुंबात शांतता नांदेल.
कर्क: प्रवासात त्रास संभवतो. जमीन व वाहन या विषयीच्या समस्या भेडसावतील. शांतता लाभेल. मित्रांचे सहकार्य मिळेल. मन विचलित होण्याची शक्यता आहे.
सिंह: आजचा दिवस प्रवासास अनुकूल आहे. एखादी चांगली बातमी मिळू शकेल. धनलाभ संभवतो. नवीन कार्य हाती घेऊ शकाल.
कन्या: नवीन कार्याचा आरंभ करण्यात त्रास होईल. कुटुंबियांशी वाद शक्य. संयम ठेवावा लागेल. भावंडांशी चर्चा करू शकाल. नशिबाची साथ लाभेल.
तूळ: हाती घेतलेले काम सहजपणे पूर्ण करू शकाल. पैसा खर्च होईल. शक्यतो कुटुंबियांशी मतभेद टाळावेत. अहंपणा बाजूला ठेवून व्यावहारिक निर्णय घ्यावा.
वृश्चिक: संतापीपणा, अविचारीपणा ह्यामुळे अडचणीत येण्याची शक्यता. आरोग्याची काळजी घ्यावी. आर्थिक बाबींचे योग्य नियोजन करू शकाल.
धनु: व्यापार-व्यवसायासाठी लाभदायी दिवस. कौटुंबिक वातावरण आनंदी. नोकरीत बढती संभवते. व्यापारात लाभ. वक्तव्य संयमित ठेवावे.
मकर: आजचा दिवस आनंददायी. व्यापार -व्यवसायात वृद्धी संभवते. सहकारी उत्तम सहकार्य करतील. प्राप्तीत वाढ संभवते. लाभ होतील.
कुंभ: नवीन काम सुरू करू शकाल. व्यापारात लाभाच्या संधी लाभतील. एखादा लाभ संभवतो. उत्तम सौख्य लाभेल. शासकीय कामात यश प्राप्ती.
मीन: कृतीवर संयम ठेवावा. हितशत्रूंचा त्रास संभवतो. गूढ विद्येची आवड निर्माण होईल. एखादी चांगली बातमी मिळेल. शक्यतो आज वाद टाळावेत.