आजचे भविष्य, १० ऑगस्ट: पदोन्नती, यश-लाभ

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...

मेष: सरकारी व निम-सरकारी कामात यश मिळेल. प्राप्तीचे नवीन स्त्रोत प्राप्त होतील. अचानक धनलाभ होण्याची शक्यता.

वृषभ: पदोन्नती होईल. सरकारकडून लाभ मिळण्याची बातमी मिळेल. मान-प्रतिष्ठा वाढेल. अडलेली कामे पूर्ण होतील. 

मिथुन: आजचा दिवस प्रतिकूलतेचा असल्याने आपल्या कामास विलंब होईल. मनात उत्साह असणार नाही. मतभेद होतील.

कर्क: मनातील नकारात्मकता नैराश्य निर्माण करेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कुटुंबियांशी भांडण होईल.

सिंह: पती-पत्नीत किरकोळ कारणांनी खटका उडून मतभेद होतील. भागीदारांशी मतभेद होतील. प्रश्न सुटायला विलंब होईल.

कन्या: आजचा दिवस शुभ फलदायी. मन प्रसन्न राहील. काही सुखद प्रसंग घडतील. आर्थिक लाभ होतील. यश मिळेल.

तूळ: आजचा दिवस अत्यंत सुखात जाईल. काही चांगली बातमी मिळेल. प्रगती होईल. सहकार्य मिळेल. 

वृश्चिक: आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. शक्यतो आज शांत राहावे. मन चिंतीत राहील व संबंधीतांशी मतभेद होतील. 

धनु: एखाद्या गूढ विद्येचे आकर्षण वाटेल. कामात यश मिळेल. नशिबाची साथ मिळेल. सामाजिक मान-सन्मान संभवतात. 

मकर: शेअर मार्केट किंवा लॉटरी ह्यात गुंतवणूक करू शकाल. अचानक धनलाभ होईल. साहसी वृत्ती असलेल्यांसाठी आजचा दिवस अनुकूल.

कुंभ: आजचा दिवस शुभ फलदायी. व्यावहारिक अनुभव चांगले येतील. स्वादिष्ट भोजनाचा आनंद घ्याल. 

मीन: आज मन अशांत राहिल्यामुळे एकाग्रतेचा अभाव दिसून येईल. आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करावी.

Click Here