जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
रागाचे प्रमाण वाढल्याने काम बिघडण्याची शक्यता आहे. तेव्हा रागावर नियंत्रण ठेवा.
वेळेवर जेवण व झोप न झाल्याने मानसिक बेचैनी वाटेल. प्रवासात विघ्न येण्याची शक्यता असल्याने प्रवास टाळा.
कुटुंबीय, मित्रमंडळी व प्रिय व्यक्तीसह बाहेर फिरायला जाण्याचा बेत कराल. सार्वजनिक जीवनात मान - प्रतिष्ठा वाढेल.
कुटुंबियांना वेळ देऊ शकाल. त्यांच्या सहवासात घरात वेळ घालवाल. कार्यात सफलता मिळेल.
आज आपण शारीरिक व मानसिक दृष्टया शांतपणे काम कराल. सृजनात्मक कामांची अधिक गोडी लागेल.
आज आपणास प्रतिकूलतेस तोंड देण्यास तयार राहावे लागेल. आरोग्य विषयक तक्रारी राहतील.
सांप्रतकाळी धाडस करणे, एखादे काम हाती घेणे यांसाठी दिवस अनुकूल आहे. योग्य क्षेत्रातील गुंतवणूक लाभदायक.
'मौनं सर्वार्थ साधनम्' या नीतीने वागा म्हणजे कुटुंबियांशी संघर्ष होणार नाही. आरोग्याच्या तक्रारी राहतील.
आज आपल्या कामात यश व आर्थिक लाभाची शक्यता आहे. एकादया मंगल कार्यास सहकुटुंब हजर राहाल.
नातलग, संबंधित व कुटुंबीय यांच्याशी जपून बोला कारण आपले बोलणे कोणाचे मन दुखावण्याची शक्यता आहे.
मित्रगण विशेषतः स्त्री वर्गाकडून लाभ होईल. सामाजिक क्षेत्रात आपणाला प्रसिद्धी व प्रतिष्ठा मिळेल.
अधिकार्यांचे प्रोत्साहन आपला उत्साह द्विगुणित करेल. व्यापारी वर्गाला व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल.