जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
मेष: रागावर नियंत्रण ठेवा. एखाद्या मंगल कार्यास किंवा बाहेरगावी जाण्याचा प्रसंग येईल.
वृषभ: प्रवासात विघ्न येण्याची शक्यता असल्याने प्रवास करू नका. मनास शांतता लाभण्यासाठी प्रयत्न करावेत.
मिथुन: मौज-मजा व मनोरंजन यांत विशेष रस घ्याल. सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल.
कर्क: आजचा दिवस चिंतामुक्त राहील. कुटुंबियांना वेळ देऊ शकाल. कार्यात सफलता, नोकरीत लाभ होईल.
सिंह: सृजनात्मक कामांची अधिक गोडी लागेल. साहित्य व कला क्षेत्रांत काही नवनिर्मिती करण्याची प्रेरणा मिळेल.
कन्या: मनावर काळजीचे दडपड राहिल्याने मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. कुटुंबियांशी खटका उडेल. पैसा खर्च होईल.
तूळ: सांप्रतकाळी धाडस करणे, एखादे काम हाती घेणे यांसाठी दिवस अनुकूल. योग्य क्षेत्रातील गुंतवणूक लाभदायक.
वृश्चिक: आज नकारात्मक मानसिक वृत्ती टाळावी. 'मौनं सर्वार्थ साधनम्' या नीतीने वागा म्हणजे संघर्ष होणार नाही.
धनु: कामात यश व आर्थिक लाभाची शक्यता आहे. मंगल कार्यास सहकुटुंब हजर राहाल. यश व कीर्ती वाढेल.
मकर: एखाद्या मंगल कार्यांत मग्न राहाल. परोपकारी कार्यांवर पैसा खर्च होईल. आरोग्याकडे लक्ष द्या.
कुंभ: आज नवे काम हाती घेऊ शकाल. नोकरी - व्यवसायात लाभ होऊन अतिरिक्त प्राप्ती होईल. लाभ होईल.
मीन: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कामातील यश व वरिष्ठ अधिकार्यांचे प्रोत्साहन आपला उत्साह द्विगुणित करेल.