जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
आज आपण सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल. गूढ रहस्यमय विद्येचे आपणास आकर्षण राहील.
कुटुंबीय व निकटचे मित्र यांच्या सह उत्तम भोजनाचा आस्वाद घ्याल. एखाद्या जवळच्या प्रवासाचे नियोजन कराल.
घरात शांततेचे व आनंदाचे वातावरण राहील. सुखाचे प्रसंग येतील. खर्च होईल पण तो कारणी लागेल.
आजच्या दिवसाची सुरूवात चिंता व उद्वेगाने होईल. आरोग्याच्या तक्रारी पण राहतील.
आज आपले शारीरिक व मानसिक आरोग्य नादुरुस्त असेल. कुटुंबियांशी मतभेद होतील.
आज प्रत्येक कामात विचारपूर्वक पाऊल टाकावे लागेल. भावंडांशी सौहार्दाचे संबंध टिकून राहतील.
आज आपली मनःस्थिती द्विधा झाल्याने आपण कोणत्याही बाबतीत ठाम निर्णय करू शकणार नाही.
आजचा दिवस शुभ फलदायी आहे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील.
प्रकृती बिघडेल. कुटुंबियांशी कटकट झाल्याने मन दुःखी होईल. व त्यामुळे मानसिक दृष्टया सुद्धा अस्वस्थ राहाल.
सामाजिक क्षेत्र, व्यापार व इतर क्षेत्रातही आजचा दिवस आपणाला लाभदायी आहे.
आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आज प्रत्येक कामात सहजपणे यश मिळू शकेल. मनःस्थिती आनंदी राहील.
आज आपण मानसिक अस्वास्थ्यामुळे त्रस्त व्हाल. शरीरास थकवा व आळस जाणवेल. वरिष्ठांशी मतभेद संभवतात.