जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
मेष: ठरविलेले काम सहज पूर्ण कराल. मंगल कार्याला उपस्थिती लावाल. प्रवास संभवतो. रागावर ताबा ठेवावा.
वृषभ: कार्यात यश मिळण्यासाठी जरा विलंब लागेल. प्रवासात विघ्ने येतील. कामाचा व्याप वाढल्यामुळे थकून जाल.
मिथुन: मन आनंदाने भरून जाईल. सार्वजनिक जीवनात सन्मान मिळेल. लोकप्रियता वाढेल. फायदा होईल.
कर्क: आजचा दिवस खुशीचा व यशाचा आहे. लाभ होईल. आर्थिक लाभ होईल. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल.
सिंह: साहित्य लेखनात नवीन कार्य प्रदान कराल. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. हातून एखादे परोपकारी कृत्य घडेल.
कन्या: प्रत्येक कार्यात प्रतिकूलतेचा अनुभव येईल. कुटुंबियांशी पटणार नाही. कागदपत्रांवर सही करताना विचार करा.
तूळ: नवीन कामाची सुरुवात करण्यास दिवस अनुकूल. आर्थिक लाभाची शक्यता. विदेशातून चांगल्या बातम्या येतील.
वृश्चिक: आज कौटुंबिक कलह होण्याची शक्यता आहे. मनात येणारे नकारात्मक विचार दूर सारावे लागतील.
धनु: यश प्राप्त होण्यास आजचा दिवस उत्तम. व्यापारात लाभ. आर्थिक लाभ. सुख-समाधान, सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.
मकर: कठोर परिश्रमानंतरही कमी यश मिळाल्याने मनात नैराश्य उत्पन्न होईल. परोपकारी कार्यावर पैसा खर्च होईल.
कुंभ: नोकरी-व्यवसायात लाभ प्राप्ती होईल. आर्थिक लाभाच्या दृष्टीकोनातून आजचा दिवस फार चांगला आहे.
मीन: नोकरी किंवा व्यवसायात यश मिळाल्याने अत्यंत प्रसन्नतेचा अनुभव येईल. व्यापार वृद्धी होईल. वसुलीची रक्कम प्राप्त होईल.