आजचे भविष्य, ०५ ऑगस्ट: धनलाभ, मान-सन्मान

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...

मेष: आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. कामे वेळेवर पूर्ण होणार नाहीत. नोकरीत वरिष्ठांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल.

वृषभ: मित्र व स्वकीयांसह हिंडण्या-फिरण्यामुळे आनंद मिळेल. सुंदर वस्त्राभूषणे व स्वादिष्ठ भोजनाची संधी मिळेल.

मिथुन: आजचा दिवस भरपूर मनोरंजन करून आनंदात घालविण्याचा आहे. रुचकर भोजनाचा आस्वाद घेता येईल.

कर्क: नोकरीत वातावरण अनुकूल राहील. अपुरी कामे पूर्णत्वास जातील. शत्रूवर विजय मिळवाल. अपेक्षित यश मिळू शकेल. 

सिंह: आजचा दिवस प्रतिकूलतेचा. अस्वस्थता जाणवेल. कुटुंबियांशी वाद होऊ शकेल. धन, कीर्ती हानी संभवते.

कन्या: आजचा दिवस भाग्यवर्धक आहे. अनेक लाभ होतील. आप्तांकडून काही लाभ संभवतो. 

तूळ: कौटुंबिक वाद होण्याची शक्यता असल्याने वक्तव्यावर संयम ठेवावा लागेल. मनात नकारात्मक विचार येतील.

वृश्चिक: आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. सौख्य व समाधान लाभेल. चांगली बातमी ऐकीवात येईल.

धनु: आजचा दिवस प्रतिकूलतेचा. आनंद व सौख्यलाभ ह्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागेल. स्वभावातील तापटपणा वाढेल.

मकर: आजचा दिवस व्यापार-व्यवसायासाठी लाभदायी आहे. काही फायदा संभवतो. काही सुखद प्रसंगामुळे आनंदित व्हाल.

कुंभ: आजचा दिवस लाभदायी. व्यापार-व्यवसायातील प्राप्तीत वाढ. सामाजिक मान-सन्मान. पदोन्नती संभवते. 

मीन: बौद्धिक विषयात व त्या संबंधी लेखनात मग्न रहाल. नवीन कार्याची सुरुवात करू शकता. धनलाभ संभवतो.

Click Here