आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट: शुभ धनलाभ योग

तुमच्यासाठी आजचा दिवस कसा असेल? जाणून घ्या...

मेष: आजचा दिवस आगळा-वेगळा अनुभव देणारा ठरेल. एखाद्या विषयात प्राविण्य मिळण्याची शक्यता आहे. 

वृषभ: अचानक धनलाभ होईल. व्यापारात वृद्धी होईल. सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रांत यश-प्रतिष्ठा मिळेल.

मिथुन: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. यश व कीर्ती लाभेल. आर्थिक लाभ होतील. खर्चाचे प्रमाण वाढेल. 

कर्क: आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. नवीन कार्यारंभासाठी आजचा दिवस प्रतिकूल आहे.

सिंह: आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. उक्ती व कृतीवर संयम ठेवल्यास संभाव्य वाद टाळू शकाल. 

कन्या: आजचा दिवस शारीरिक उत्साह व मानसिक प्रसन्नता मिळवून देणारा आहे. कार्यात यश मिळेल. सहकार्य मिळेल.

तूळ: एखादा महत्त्वाचा निर्णय आज टाळणे हितावह राहील. हट्टीपणा सोडून सर्वमान्य मार्ग स्वीकारावा.

वृश्चिक: आज मानसिक प्रसन्नता लाभेल. घरात समाधानाचे वातावरण राहील. मित्र भेटीने आनंद होईल.

धनु: आजचा दिवस कष्टदायी आहे. कुटुंबियांशी मतभेद होतील. बोलणे व वागणे यांवर संयम ठेवावा लागेल.

मकर: आजचा दिवस लाभदायी आहे. मित्रांशी भेट आनंददायी ठरेल. व्यापारात दिवस लाभदायी ठरेल. 

कुंभ: मानसिक स्थिती चांगली राहील. कामाचे कौतुक होईल. आनंद होईल. समाजात मान-सन्मान प्राप्त होतील.

मीन: आज वरिष्ठांशी मतभेद होतील. शारीरिक कंटाळा व मानसिक चिंता राहील. वादविवाद टाळा. 

Click Here