जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
मेष: सगळेच मनासारखे मिळू शकेल. आयात-निर्यात व्यापारात लाभ व यश मिळेल. हरवलेली वस्तू परत मिळेल. आर्थिक लाभ व वाहनसुख मिळेल.
वृषभ: दिवस शुभ फलदायी. ठरवलेली कामे व्यवस्थित पार पडतील. अपूर्ण कामे पूर्ण होतील. आर्थिक लाभ होईल. आनंदाच्या बातम्या मिळतील.
मिथुन: सर्वत्र लाभच लाभ आहेत. कौटुंबिक सुख-शांती राहील. नोकरी-व्यवसायात उत्पन्न वाढेल. घरात शुभकार्ये. उत्तम भोजन व वैवाहिक सुख मिळेल.
कर्क: आनंद व स्फूर्ती अभाव. मन खिन्न होईल. काही कारणांनी त्रास होईल. निद्रानाश होईल. स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो. पैसा खर्च होईल.
सिंह: कार्यातील यश व प्रतिस्पर्ध्यांवर विजयाची धुंदी मनावर राहिल्याने आपणास प्रसन्न वाटेल. आर्थिक लाभ व प्रिय व्यक्तीचा सहवासाने खुश व्हाल.
कन्या: कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. लोकप्रियता मिळेल. आर्थिक लाभ होतील. स्वादिष्ट भोजन मिळेल. विद्यार्थ्यांना दिवस अनुकूल.
तूळ: कला कौशल्य दाखविण्यास सुवर्ण संधी मिळेल. आर्थिक लाभ होईल. स्वादिष्ट भोजन, वस्त्र व वाहन सुख मिळेल. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल.
वृश्चिक: विदेशात राहणारे स्नेही व नातलगांकडून आनंददायी बातम्या मिळतील. लाभ होईल. आनंद प्राप्तीसाठी पैसा खर्च होईल.
धनु: दिवस लाभदायक आहे. प्रिय व्यक्तीचा सहवास संस्मरणीय राहील. उत्पन्नाचे मार्ग वाढतील. उच्च अधिकारी व वडीलधारी यांची मर्जी राहील.
मकर: व्यापार-व्यवसायात लाभ होईल. वसुली, मिळकतीसाठी दिवस लाभदायी. सरकारी कामात यश. नोकरीत बढती. लाभ होईल. प्रतिष्ठा वाढेल.
कुंभ: शारीरिकदृष्टया थकवा, बेचैनी व उबग जाणवेल. कामात उत्साह वाटणार नाही. वरिष्ठांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. आनंददायी बातम्या येतील.
मीन: अचानक खर्च वाढतील. इतर कामकाजात प्रतिकूलता. कुटुंबियांशी मतभेद होतील. जपून बोला. अचानक धनलाभाने त्रास दूर होईल.