जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
आज आपणास रागावर ताबा ठेवावा लागेल. अन्यथा आपल्या कामात बिघाड व संबंधात कटुता निर्माण होईल.
आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका. योग्य आहार घ्या. आज कामाचा व्याप वाढेल. शिथिलता राहील.
मित्र व प्रिय व्यक्तीसह मनोरंजनात्मक प्रवास घडेल. वाहनसुख मिळेल. नववस्त्रांची खरेदी होईल.
सुखद प्रसंग घडतील. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश मिळेल. प्रकृती उत्तम राहील. कुटुंबियांसह आनंदात वेळ जाईल.
आवडत्या व्यक्तीची भेट फलदायी होईल व त्यामुळे दिवसभर मन आनंदी राहील.
स्फूर्तीचा अभाव असेल. स्वकीयांचे गैरसमज होतील. आईची तब्बेत बिघडेल. घर, जमीन इ. कागदपत्रे जपून ठेवावी लागतील.
परदेशातून चांगल्या बातम्या मिळतील. व्यावहारीक कारणांनी प्रवास घडेल. नव्या कामाचा आरंभ करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे.
कुटुंबातील सदस्यांचे गैरसमज होण्याची शक्यता आहे. शारीरिक त्रास व मनात मरगळ राहील. नकारात्मक विचार येतील.
एखादा प्रवास कराल. सगे सोयरे व मित्रांच्या आगमनाने मन खुश होईल. दांपत्य जीवनात जवळीक व गोडी राहील
मांगलिक कार्यावर खर्च कराल. परोपकारी व्यवहार वाढतील. शत्रूंचा त्रास होईल. डाव्या डोळ्यास त्रास होईल.
पत्नी व संततीकडून चांगल्या बातम्या मिळतील. कौटुंबिक जीवन व दांपत्य जीवन ह्यात सुखा- समाधानाचा अनुभव येईल.
वडील व वडीलधार्यांकडून लाभ होईल. आर्थिक लाभ होऊन कुटुंबात आनंद पसरेल. सरकारकडून लाभ मिळतील.