१९ ऑक्टोबर २०२५ : कोणासाठी चांगला, कोणासाठी निराशेचा...
बौद्धिक कार्यात रुची वाढेल. जवळपासचे प्रवास घडतील. सेवा कार्यासाठी दिवस अनुकूल आहे.
बैठका, चर्चा ह्यात सुद्धा आपणाला यश मिळेल. कष्टाचे अपेक्षित फळ मिळाले नाही तरी सुद्धा आपण त्या क्षेत्रात प्रगती पथावर राहाल.
बौद्धिक चर्चेचे प्रसंग येतील पण त्यात वादविवाद टाळावेत. कौटुंबिक व स्थावर संपत्ती विषयी शक्यतो चर्चा टाळावी.
मंगल कार्याची सुरूवात करायला आजचा दिवस अनुकूल आहे. कामातील यश व प्रियव्यक्तीचा सहवास ह्यामुळे आपण आनंदीत राहाल.
मित्र - मैत्रिणी सुद्धा मदत करतील. डोळे व दातांच्या तक्रारी वाढतील. उत्तम भोजन प्राप्ती होईल.
आजचा दिवस व्यवसायाच्या दृष्टीने लाभदायक आहे. प्रकृती उत्तम राहील व मन सुद्धा प्रसन्न राहील.
अचानकपणे खर्चात वाढ होईल. व्यावसायिक व्यक्तींशी मतभेद होतील. वाणीवर संयम ठेवावा लागेल.
विवाहोत्सुक व्यक्तींना योग्य जोडीदार मिळेल. पत्नी व संतती कडून लाभ होईल. विशेषतः स्त्री वर्गाकडून फायदा होईल.
आर्थिक योजना चांगल्या प्रकारे पूर्ण कराल. व्यापार - व्यवसायासाठी प्रवास घडू शकतो.
सरकारी कामात प्रतिकूलता जाणवेल. शरीरास थकवा जाणवेल व मनःस्थिती पण ठीक राहणार नाही.
आर्थिक चणचण जाणवेल. खूप विचार केल्याने मानसिक थकवा जाणवेल. आपल्या मनावरचा ताण कमी करण्यासाठी प्रयत्न करावे.
मेजवानी, सहल ह्यातून मनोरंजन होईल. दांपत्य जीवनाचा भरपूर आनंद मिळेल. वस्त्रे अलंकार, वाहन खरेदी होईल.