आजचे राशीभविष्य २५ ऑक्टोबर २०२५
आजचा दिवस नवीन कामाचा आरंभ करण्यास अनुकूल नाही. प्रवासात अचानक संकटे येतील. क्रोध व वाणी ह्यावर संयम ठेवावा लागेल.
विदेशातील मित्रां कडून आनंददायी बातम्या मिळतील. अचानक धनलाभ होईल. व्यापार्यांना व्यापारात वृद्धी होईल.
आर्थिक लाभ होतील. खर्चाचे प्रमाण मात्र वाढेल. पण केलेला खर्च वाया जाणार नाही. शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील. स्वभावात रागाचे प्रमाण मात्र वाढेल.
पोटदुखी, अपचन, अजीर्ण इ. व्याधींमुळे हैराण व्हाल. अचानक पैसा खर्च करावा लागेल. एकादी मानहानी संभवते. शक्यतो प्रवास टाळावा.
मनावर वैचारिक नकारात्मकतेचा पगडा राहील. संपत्तीच्या कागदपत्रावर सही करताना दक्षता घ्यावी. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
कुटुंबीय व मित्रपरिवार ह्यांच्याशी असलेल्या संबंधात गोडवा वाढेल. त्यांचे चांगले सहकार्य मिळेल. एखाद्या विषयात प्राविण्य मिळवू शकाल.
वाणीवर संयम ठेवल्यास कुटुंबियांशी होणारे संभाव्य वाद टाळू शकाल. हट्टीपणा सोडून सर्वमान्य मार्ग स्वीकारणे हितावह राहील.
मित्र व स्नेही यांच्या भेटीने आनंद होईल. एखाद्या प्रेक्षणीय स्थळी सहलीला जाण्याची शक्यता आहे.
एखादी दुर्घटना संभवते. पैसा जास्त प्रमाणात खर्च होईल. न्यायालयाशी संबंधित कामकाजात जपून पावले उचलावीत.
व्यापारात सुद्धा दिवस लाभदायी ठरेल. सहल - प्रवास होतील. मित्रांकडून भेटवस्तू मिळतील.
मित्र व कुटुंबीयांसह आनंददायी प्रवास कराल. आज दिवसभर कामे सहजपणे यशस्वी होत असल्याचा अनुभव येईल. त्या कामातून लाभ होतील.
वैचारिक पातळीवर नकारात्मकता काढून टाका व मानसिक स्वास्थ्य मिळविण्याचा प्रयत्न करा. प्रवास यशस्वी होतील.