राशीभविष्य- ११ ऑक्टोबर २०२५: क्रोधावर संयम आवश्यक

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...?

आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य साधारण राहील. खर्चाच्या काळजीमुळे मन अशांत राहील. वाणीवर संयम ठेवणे आवश्यक आहे.

शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. धनलाभ होऊन आर्थिक नियोजन सुद्धा यशस्वीपणे करू शकाल. 

आज आपणास आपल्या बोलण्यावर व व्यवहारात सावध राहावे लागेल. आपल्या वक्तव्याने काही गैरसमज होण्याची शक्यता आहे. आपले स्वास्थ्य खराब असू शकेल.

आजचा दिवस लाभदायी आहे. नोकरी - व्यवसायातील वातावरण अनुकूल असेल. धनलाभाची शक्यता आहे. 

आज आपणास प्रत्येक कामात उशीरा यश मिळेल. कार्यालयात किंवा घरात जबाबदार्‍यांचे ओझे वाढेल. जीवनात अधिक गंभीरतेचा अनुभव होईल.

आज शरीरात थकवा, आळस व चिंता अनुभवास येतील. संतती बरोबर मतभेद होतील. त्यांच्या स्वास्थ्याची चिंता सतावेल. 

 क्रोध, व कामवृत्ती ह्यावर संयम ठेवणे आवश्यक आहे. हितशत्रू सरसावतील. अचानक धनलाभ होईल. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल. 

आज आपणास नोकरी, व्यापार किंवा व्यवसाय ह्यातून भरपूर लाभ होणार आहे. तसेच मित्र, थोर मंडळी, सगेसोयरे यांच्या कडून ही लाभ होईल. 

आजचा दिवस नोकरदारांना लाभदायक आहे. आर्थिक लाभाची शक्यता आहे . घरात आनंदाचे वातावरण राहील. 

आज कला व साहित्य क्षेत्रात असणार्‍या व्यक्ती त्या क्षेत्रात विशेष कामगीरी करतील. प्रेमिकांना परस्परांत गाढ प्रेमाचा अनुभव येईल. 

आज स्वभाव जास्त हळवा बनल्याने मानसिक अस्वास्थ्य राहील. आर्थिक बाबींचे नियोजन कराल. आईकडून अधिक प्रेमाचा वर्षाव झाल्याचा अनुभव येईल. 

आजचा दिवस कार्यात यश मिळण्यास व महत्वपूर्ण निर्णय घेण्यास उत्तम आहे. वैवाहिक जोडीदाराशी जवळीक वाढेल. 

'अपना टाइम भी आएगा! बस, घरात लावा या रंगाची घड्याळ...!

Click Here