आजचे राशीभविष्य ११ मार्च २०२६
शक्यतो प्रवास टाळा. प्रवासात अनपेक्षित अडचणी उदभवतील. नवीन कार्ये हाती घेतल्यास त्यात सुद्धा अडचणी येतील. एखाद्या विषयात प्राविण्य मिळवू शकाल.
सामाजिक जीवनात यशप्राप्ती होईल. परदेशातून मनासारख्या बातम्या येतील. वैवाहिक जीवनात गोडी राहील.
इतरांशी बोलताना आपल्या रागावर नियंत्रण ठेवून मितभाषी राहिल्यास मतभेदाचे प्रसंग उदभवणार नाहीत. धनप्राप्ती होईल. आवश्यक तेवढाच खर्च कराल.
भिन्नलिंगी व्यक्तींकडे आकर्षित झाल्याने एखाद्या संकटात सापडाल. आज यात्रा, प्रवास किंवा नवीन कामाची सुरुवात करणे हितावह होऊ शकणार नाही.
नकारात्मक विचारांमुळे निराशा येईल. जलाशय धोकादायक ठरू शकतात. नोकरीत स्त्री वर्गा पासून जपून राहा.
गूढ व रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील. एखाद्या विषयात प्रावीण्य प्राप्त होईल. विरोधक व प्रतिस्पर्धी ह्यांचा जोमाने प्रतिकार करावा लागेल.
द्विधा स्थितीत अडकलेले मन कोणताही ठोस निर्णय घेऊ देणार नाही. आज शक्यतो महत्त्वाचा निर्णय घेऊ नये.
प्रिय व्यक्तीशी सुसंवाद साधण्यात यश मिळेल. मंगल कार्याला उपस्थिती लावाल. धनलाभ व प्रवास संभवतात. दांपत्य जीवनात प्रसन्नता अनुभवाल.
मनाचा अतीउत्साह आवरावा लागेल. एखादा अपघात संभवतो. शारीरिक स्वास्थ्य बिघडेल. पैसा खर्च होईल.
व्यापार्यांची व्यापारात व नोकरदारांची नोकरीत प्राप्ती वाढेल. कौटुंबिक जीवनात आनंद राहील. नव्या वस्तूंची खरेदी होईल.
प्रकृती उत्तम राहील. मानसिक उत्साह जाणवेल. बढती व धनप्राप्ती संभवते. कौटुंबिक जीवन आनंदी राहून आपली मान - प्रतिष्ठा वाढेल.
कार्यालयात वरिष्ठांशी मतभेद होतील. संतती हे आजच्या चिंतेचे प्रमुख कारण राहील. अकारण पैसा खर्च होईल.