आज यशाची शिखरे गाठणाऱ्या राशी कोणत्या... 'या' राशींनी टाळावा वाद
आजचे राशीभविष्य ५ जानेवारी २०२६
विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. स्वाभिमान दुखावला जाईल. नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी स्त्री वर्गापासून जपून राहावे लागेल.
आर्थिक गोष्टींकडे अधिक लक्ष दिले तर प्रत्येक कामात यश मिळेल. नशिबाची साथ लाभेल. भावंडांचे सहकार्य मिळेल.
मित्र व हितचिंतकांचा सहवास घडेल. व्यवसायात उत्साह व प्रसन्नता वाढेल. सहकारी अपेक्षित सहकार्य करतील. कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवाल.
प्रवास किंवा सहलीची शक्यता आहे. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. भावनाशील व्हाल. आज काही आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
शक्यतो निरर्थक वाद टाळा. कोर्ट- कचेरीतील कामे जपून करा. विदेशातून काही बातमी येईल. संयमित राहा. स्त्रीयांशी सावधपणे व्यवहार करा.
एखाद्या स्त्रीची भूमिका महत्वाची असेल. मित्रासह एखाद्या रम्य- स्थळी जाल. संतती कडून चांगली बातमी मिळेल.
पदोन्नती संभवते. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. माते कडून फायदा होईल. सरकारी कामात यश मिळेल.
प्रतिस्पर्ध्यांशी वाद संभवतात. अनावश्यक खर्च वाढतील. वरिष्ठांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. शक्यतो आज कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नये. राजकीय समस्या उदभवतील.
सर्दी, खोकला यांमुळे प्रकृती खराब राहील. मानसिक तणाव जाणवेल. धन खर्च वाढेल. निषेधार्ह व अवैध कृत्य वाईट मार्गावर नेईल हे लक्षात ठेवा.
मोठया धनलाभाची संभावना आहे. व्यापार वाढेल. भागीदारीतून लाभ होईल. दलाली, कमिशन, व्याज इत्यादीतून भरपूर प्राप्ती होईल. मान - सन्मान वाढतील.
घरातील वातावरण चांगले राहील. तन - मन उत्साही व आनंदी असेल. भावनात्मक विचारांचा दिवस आहे. नोकरीत सहकार्यांच्या मदतीने कार्य तडीस न्याल.
प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. प्रेमालाप होईल. शेअर - सट्टा बाजारात लाभ होईल. मानसिक समतोल मात्र राखावा लागेल.