नववर्षाचा पहिला दिवस! मेष ते मीन सर्व १२ राशींचे भविष्य काय सांगते?
आजचे राशीभविष्य: १ जानेवारी २०२६
कोणाशी मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. आप्तेष्टांशी मतभेद होण्याची व आपले आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे.
आर्थिक जवाबदारी व्यवस्थित पार पाडाल. आर्थिक आयोजन कराल. अलंकार, सौंदर्य प्रसाधने व मनोरंजन ह्यावर खर्च कराल.
आपल्या वक्तव्याने गैरसमज निर्माण होतील. शारीरिक कष्ट मनाला अस्वस्थ बनवतील. कौटुंबिक वातावरण गढूळ राहील.
शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. रमणीय स्थळी सहलीचे बेत आखाल. पत्नी व संतती कडून सौख्य लाभेल.
कला व क्रीडा क्षेत्रांतील व्यक्तींना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल. धनाच्या दृष्टीने सरकारी कामे सफल होतील.
मित्र व संबंधीतांशी होणार्या चर्चेमुळे आनंद होईल. विदेशातील स्नेह्यांकडून आनंददायी बातमी मिळेल.
द्वेषापासून दूर राहा. हितशत्रूंचा त्रास संभवतो. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. रहस्यमय व गूढविद्येकडे आकर्षित व्हाल. एखाद्या विषयात प्राविण्य मिळवू शकाल.
मान - सन्मानात वाढ होऊन एखादा सत्कार होण्याची शक्यता सुद्धा आहे. वाहनसौख्य मिळेल.
प्रकृती उत्तम राहील. मातुल घराण्याकडून एखादी चांगली बातमी मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. वाणीवर संयम ठेवावा लागेल.
नशिबाची साथ नसल्याने आज कोणतेही महत्वाचे काम न करणे हितावह राहील. संततीच्या आरोग्याची काळजी राहील.
मातेकडून लाभाची शक्यता आहे. जमीन, घर व वाहन इत्यादींचे व्यवहार काळजी पूर्वक करावेत. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अनुकूलता लाभेल.
मित्र व कुटुंबियांसह एखाद्या प्रवासाला जाल. भावंडां कडून फायदा होईल. कामाचे यश आपले मन आनंदी करेल. सार्वजनिक जीवनात मान - सन्मान होतील.