आजचे राशीभविष्य : सरकारी लाभ मिळणार, प्रमोशन होणार 

तुमचा आजचा दिवस कसा असेल, राशीभविष्य जाणून घ्या

शक्यतो स्थावर संपत्तीची चर्चा टाळावी. अपघाताच्या शक्यतेमुळे वाहन जपून चालवावे व जलाशया पासून दूर राहावे. प्रेम संबंध सुद्धा दृढ होतील. असे असले तरी सामंजस्याच्या अभावामुळे वाद सुद्धा होऊ शकतात.

कौटुंबिक विषयात रस घ्याल व प्रवासाचे बेत आखाल. आर्थिक व्यवहारांकडे अधिक लक्ष देऊ शकाल. वैवाहिक जोडीदाराशी समन्वय साधावा. आपसातील सामंजस्याच्या अभावामुळे मतभेद सुद्धा होऊ शकतात.

आर्थिक कामात अडथळे दूर होऊन मार्ग मोकळा सापडेल. नातेसंबंधांसाठी कालावधी चांगला आहे. नोकरीच्या ठिकाणी नवीन जवाबदारी सुद्धा देण्यात येऊ शकते. आर्थिक स्थितीत सुद्धा सुधारणा होईल.

वैवाहिक जीवनाचा मनसोक्त आनंद उपभोगू शकाल. प्रवासाची व आर्थिक लाभाची शक्यता आहे. वैवाहिक जोडीदाराशी वाद संभवतो. त्याचा प्रभाव वैवाहिक नात्यावर होऊ शकतो.

उग्र स्वभावाने किंवा वाद - विवादामुळे कोणाबरोबर संघर्ष होईल. वैवाहिक जोडीदाराशी सुद्धा मतभेद संभवतात. आपली आर्थिक स्थिती सुद्धा मजबूत राहील. आपला अडकलेला पैसा सुद्धा आपणास परत मिळू शकतो.

व्यापारात व नोकरीत आर्थिक लाभ होईल. वरिष्ठ आपल्यावर खूष झाल्याने पदोन्नतीची शक्यता आहे. विवाहोत्सुकासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. स्त्री मित्र लाभदायक होतील. 

आज आपली कामे सहजतेने पूर्ण होतील. व्यापारात तसेच मिळकतीत वाढ होईल. सूर्याच्या कन्येतील भ्रमणाचा चांगला प्रभाव आपल्यावर होत असल्याचे दिसेल. सावध राहावे लागेल. 

कार्यक्षेत्रात सुद्धा अधिकारी वर्गाचे नकारात्मक वागणे आपणास हताश बनवेल. एखादी नवीन नोकरी सुद्धा मिळू शकते. व्यापारासाठी सुद्धा दिवस अनुकूल आहेत. आपल्या प्राप्तीत सुद्धा वाढ होत असल्याचे दिसू शकते.

आज आपण नवीन कामाची सुरुवात करू नये. कफ किंवा पोटाचे विकार आपल्याला सतावतील. पाण्यापासून दूर राहा. नोकरी व व्यवसायात लाभ होईल. नवीन नोकरीची संधी सुद्धा मिळू शकते. आपली पदोन्नती सुद्धा संभवते. 

आजचा दिवस कामाचा व्याप व ताण यातून सुटका होऊन मित्र व संबंधितांसह आनंदात व्यतीत कराल. भिन्नलिंगी व्यक्तिंचे आकर्षण वाढेल. आर्थिक लाभ व मान - सन्मान ह्यात वृद्धी होईल. 

आज आपल्याला कामात यश मिळेल. कुटुंबियांशी अधिक स्नेहाचे व्यवहार होतील. दरम्यान आपणास सरकार तर्फे सुद्धा लाभ होऊ शकतो. ह्या कालावधीत आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. 

आपल्या स्वभावात हळवेवणा राहील. पोटाच्या आजाराची शक्यता आहे. मनात अनामिक भीती निर्माण होईल. मानसिक संतुलन बिघडू देऊ नका. आजचा दिवस प्रणयाराधनेसाठी अनुकूल आहे.

सकाळी ब्रश केल्यानंतर लगेच चहा पिणे योग्य की अयोग्य ?

Click Here