आजचा शुक्रवार तुमच्यासाठी कसा असेल? वाचा तुमचं नशीब.

आजचं राशीभविष्य: 'या' ३ राशींना अचानक धनलाभाची संधी!

आजचा दिवस थोडा कटकटीचा असू शकतो. आळस आणि थकवा जाणवेल. संतापामुळे बनलेली कामे बिघडू शकतात, त्यामुळे शांत राहण्याचा प्रयत्न करा.

नवीन कामाची सुरुवात आज टाळलेली बरी. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा प्रकृती बिघडू शकते. प्रवासात सावध राहा.

आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाचा आहे. मित्र आणि कुटुंबासोबत पर्यटनाचा आनंद घ्याल. नवीन वस्त्रप्रावरणं आणि वाहनसौख्य लाभेल. समाजात मान-सन्मान वाढेल.

व्यापार-व्यवसायात मोठा आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांची मदत मिळेल आणि शत्रूंवर विजय मिळवाल.

कला आणि सर्जनशील क्षेत्रातील लोकांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. मात्र, दिवसभरात रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

आज मनात थोडी अस्वस्थता राहील. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. घराशी संबंधित किंवा स्थावर मालमत्तेच्या व्यवहारात कागदपत्रे नीट तपासा.

आज तुम्ही प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकाल. प्रलंबित कामे मार्गी लागतील आणि प्रवासातून आनंद मिळेल. नातेसंबंधांमध्ये सुधारणा होईल.

कौटुंबिक शांतता हवी असेल तर बोलण्यावर ताबा ठेवा. तुमच्या शब्दांमुळे कोणाचे मन दुखावले जाण्याची शक्यता आहे. नकारात्मक विचार दूर ठेवा.

तुमच्याच राशीत चंद्र असल्याने आज तुमची सर्व नियोजित कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तुम्ही प्रसन्न राहाल. एखाद्या मंगल कार्यात सहभागी व्हाल.

आज खर्चाचे प्रमाण वाढेल. कोर्ट-कचेरीच्या कामात यश मिळणे कठीण आहे. मानहानीची शक्यता असल्याने व्यवहार करताना जपून करा.

आज लाभाचा दिवस आहे! नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी वेळ शुभ आहे. व्यापारात फायदा होईल आणि सामाजिक क्षेत्रात तुमची कीर्ती पसरेल.

नोकरीत वरिष्ठांची शाबासकी मिळेल. जुनी येणी वसूल होतील. वडिलांकडून किंवा घरातील थोरामोठ्यांकडून लाभ मिळण्याचे योग आहेत.

Click Here