मेष राशीला संमिश्र फळ, तर 'या' राशींनी आरोग्याची घ्यावी काळजी; वाचा १२ राशींचे भविष्य

आजचे राशीभविष्य १० मार्च २०२६

आज एखाद्या विषयात आपण प्रावीण्य मिळवू शकाल. वाणी व द्वेष भावना ह्यांवर आवर घालावा लागेल.

परदेशात राहण्यार्‍या संबंधिताकडून सुखद बातमी मिळाल्याने मनाला आनंद होईल. अचानक धनलाभ संभवतो.

आर्थिक लाभाची शक्यता आहे. आज खर्च होईल पण तो अनावश्यक वाटणार नाही. अडलेली कामे पूर्ण होण्याचा मार्ग सापडेल.

अचानक पैसा खर्च करावा लागेल. वादग्रस्त विषय आज टाळावेत. शक्य असेल तर प्रवास सुद्धा करू नका. अपचन, अजीर्ण असे विकार त्रास देतील. 

आई - वडिलांशी मतभेद होतील. त्यांची प्रकृती बिघडेल. जमीन, घर, वाहन खरेदी विषयक कागद पत्रांसंबंधी सावध राहा. जलाशया पासून जपा.

प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल. भावंडे व शेजारी यांच्याशी चांगले संबंध राहतील. आर्थिक लाभ होतील.

वाणीवर संयम ठेवल्यास कुटुंबीयांशी वाद होणार नाहीत. जिद्द सोडून समाधानाने राहावे लागेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. 

जोडीदाराशी जवळीक वाढेल. आर्थिक लाभ होईल. मंगल कार्या निमित्त बाहेर जावे लागेल. आनंददायक बातम्या मिळतील.

एखादा अपघात संभवतो. खर्चात वाढ होईल. कोर्ट - कचेरीचे प्रश्न काळजीपूर्वक सोडवावे लागतील. फुटकळ कामातून मनःशांती भंग पावेल.

मंगल कार्यात हजेरी लावाल. मैत्रिणी, पत्नी व संतती यांच्याकडून लाभ होईल. विवाहोत्सुक युवक - युवतींचे विवाह ठरतील. प्रवास व सहल होईल.

वडीलधारी व वरिष्ठ अधिकारी यांची मर्जी असल्याने कोणत्याही प्रकारच्या मानसिक दडपणातून मुक्त व्हाल. संसारात आनंद वाटेल. 

नोकरीत वरिष्ठांशी मतभेद संभवतात. संततीच्या समस्या सतावतील. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकणार नाही. आज शक्यतो कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ नका.

Click Here