आजचे राशीभविष्य : नवीन कामे हाती घेण्यासाठी शुभ दिवस...

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...?

आज खूप खुशीत राहाल. घरात सुख- शांतीचे वातावरण राहील. एखादा प्रवास संभवतो. आजचा दिवस नवीन काम हाती घेण्यास अनुकूल आहे. अचानक धनलाभ संभवतो. 

आज दुपार नंतर सांभाळून राहावे लागेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडेल. गुंतवणूक करताना सावधानी बाळगा. धार्मिक कार्यावर पैसा खर्च होईल.

आजचा दिवस व्यापारासाठी शुभ फलदायी आहे. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. त्यामुळे काही लाभ संभवतात. मित्रांकडून सुद्धा लाभ होतील.

आजच्या दिवसाचा प्रारंभ मानसिक तणाव व बेचैनीने होईल. दुपार नंतर मात्र मन प्रसन्न होऊन शारीरिक उत्साह वाढेल. व्यापारी येणी वसूल होतील.

आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. आचार विचारांवर संयम ठेवून अवैध गोष्टींपासून दूर राहणे हितावह राहील. त्यामुळे प्रकृती बिघडेल. अचानक धनलाभ होईल. 

आजचा सकाळचा वेळ मित्रांसोबत फिरणे, खाणे - पिणे व मनोरंजन ह्यात आनंदाने घालवाल. दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल. 

आज आपण दृढ मनोबल व आत्मविश्वासामुळे प्रत्येक कामात यशस्वी व्हाल. दुपार नंतर परिस्थितीत बदल होऊन आपण मनोरंजनाचा विचार कराल. 

आज आपल्यातील मानसिक हळवेपणा वाढेल. आपली कल्पनाशक्ती व साहित्य निर्मिती ह्यात नावीन्य दिसेल. घरात सुख - शांतीचे वातावरण राहील. 

आज कौटुंबिक शांतता राखण्यासाठी निरर्थक वाद - विवाद टाळणे हितावह होईल. आईची तब्बेत बिघडण्याची शक्यता आहे. धन व प्रतिष्ठेची हानी होण्याचा संभव आहे. 

आज मित्र व प्रिय व्यक्तीच्या भेटीमुळे आनंद वाटेल. भावंडांशी जवळीक वाढेल. दुपार नंतर मात्र अप्रिय घटनांमुळे आपले मन अस्वस्थ होईल. धन व प्रतिष्ठेची हानी होईल.

आज वाद होऊन कटुता निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे राग व वाणी ह्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. मनात नकारात्मक विचारांना थारा देऊ नका.

आज आपल्या घरी एखादे मंगल कार्य होईल. कार्ये तडीस जातील. आजचा दिवस नवीन कामे हाती घेण्यास शुभ आहे. 

सकाळी लवकर उठणं जमत नाहीये.... फॉलो करा सोप्या ९ टीप्स

Click Here