राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस

आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल. घराच्या सजावटीत बदल करण्याचा विचार मनात येईल

आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज नवीन काम करण्याची प्रेरणा मिळून त्याची आपण सुरुवात सुद्धा करु शकाल

संतापाची भावना आपले नुकसान करेल. आजारी व्यक्तींची तपासणी किंवा शस्त्रक्रिया करावी लागेल. मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल

मौल्यवान मौज - मजेच्या वस्तू, वस्त्राभूषणे तथा वाहन इत्यादींची खरेदी होईल. दांपत्य जीवन उत्तम राहील. भागीदारी फायदेशीर ठरेल

दैनंदिन कामे पूर्ण व्हायला विलंब लागेल. खूप परिश्रम कराल पण त्यामानाने कमी फळ मिळेल. नोकरीत सांभाळून राहा. 

विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळे येतील. बौद्धिक चर्चा व वाद - विवादात सहभागी होऊ नका. प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल

आज आपण खूप भावनाशील व्हाल व त्यामुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. आईशी मतभेद होतील किंवा तिच्या प्रकृतीची काळजी राहील

आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील. नशिबाची साथ मिळेल. भावंडांशी कौटुंबिक चर्चा व नियोजन होईल

आज मानसिक व्यवहारात खंबीरता नसल्यामुळे कोणताही निर्णय घाईगडबडीने घेऊ नका. महत्वाचा निर्णय घेऊच नका

मित्र तसेच सगेसोयरे यांच्याकडून भेटवस्तू मिळाल्याने आनंद होईल. कामे सहजपणे पूर्ण होतील. नोकरी - व्यवसायात लाभ होईल

आर्थिक गुंतवणूक अयोग्य ठिकाणी होणार नाही याची दक्षता घ्या. कुटुंबियांशी पटणार नाही. गैरसमज, दुर्घटना यापासून जपून राहावे

वडिलधारी व मित्रांचा सहवास लाभेल. मित्रमंडळीत नव्या मित्रांची भर पडेल. नोकरी - व्यवसायात उत्पन्न वाढेल

Click Here