कष्टाचे अपेक्षित फळ मिळाले नाही तरी..., कसा जाईल तुमचा आजचा दिवस

आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५

आपल्या व्यावसायिक क्षेत्रा बाहेरील लोकांशी सुद्धा संपर्क होईल. बौद्धिक कार्यात रुची वाढेल. जवळपासचे प्रवास घडतील.

कष्टाचे अपेक्षित फळ मिळाले नाही तरी सुद्धा आपण त्या क्षेत्रात प्रगती पथावर राहाल. पचनसंस्थे संबंधी तक्रारी वाढून त्रास होईल.

बौद्धिक चर्चेचे प्रसंग येतील पण त्यात वादविवाद टाळावेत. कौटुंबिक व स्थावर संपत्ती विषयी शक्यतो चर्चा टाळावी.

मंगल कार्याची सुरूवात करायला आजचा दिवस अनुकूल आहे. कामातील यश व प्रियव्यक्तीचा सहवास ह्यामुळे आपण आनंदीत राहाल.

मित्र - मैत्रिणी सुद्धा मदत करतील. डोळे व दातांच्या तक्रारी वाढतील. उत्तम भोजन प्राप्ती होईल. आज आपल्या मधुर वाणीने इतरांची मने जिंकाल.

आजचा दिवस व्यवसायाच्या दृष्टीने लाभदायक आहे. प्रकृती उत्तम राहील व मन सुद्धा प्रसन्न राहील.

अचानकपणे खर्चात वाढ होईल. व्यावसायिक व्यक्तींशी मतभेद होतील. वाणीवर संयम ठेवावा लागेल. वाद टाळावेत.

विवाहोत्सुक व्यक्तींना योग्य जोडीदार मिळेल. पत्नी व संतती कडून लाभ होईल. विशेषतः स्त्री वर्गाकडून फायदा होईल.

वडील तसेच सरकारकडून फायदा मिळेल. आर्थिक योजना चांगल्या प्रकारे पूर्ण कराल. व्यापार - व्यवसायासाठी प्रवास घडू शकतो.

लेखन अथवा साहित्य विषयक कार्य व्यवस्थित पार पडेल. त्यासाठी नियोजन कराल. सरकारी कामात प्रतिकूलता जाणवेल.

कौटुंबिक वातावरण कलुशित होईल. आर्थिक चणचण जाणवेल. खूप विचार केल्याने मानसिक थकवा जाणवेल.

साहित्यिक, कलाकार, कारागिर आपल्या कलेला वाव देऊ शकतील. आदर मिळेल.