आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५, चंद्र आज कन्या राशीत...
वाणीवर संयम राखणे आवश्यक आहे. वैचारिक दृष्टया उत्साह वाटेल. एखाद्या व्यवहारातून अतिरिक्त लाभ होण्याची शक्यता आहे.
अपूर्ण कामे पूर्ण होतील. स्त्रीयांना माहेरहून आनंददायी बातमी मिळून काही लाभ सुद्धा होतील. प्रकृतीत सुधारणा होईल.
आई व स्त्रियांशी संबंधित विषयात हळवे व्हाल. शक्यतो प्रवास टाळण्याचा प्रयत्न करावा. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल.
आज केलेल्या कार्यात यश मिळवू शकाल. नोकरी- व्यवसायात प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. आर्थिक लाभ होतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.
संबंधां मधील भावनांची जाणीव आपणाला होईल. एखाद्या रम्य पर्यटनस्थळी सहलीला जाण्याचे ठरवाल. मानसिक दृष्टया चिंतामुक्त व्हाल.
आर्थिक लाभ होतील. सुख व आनंद मिळेल. चांगल्या बातम्या समजतील. आनंददायी प्रवास होईल. उत्तम वैवाहिक सुखाचा अनुभव घ्याल.
दृढ विचारांमुळे हाती घेतलेले काम पूर्ण कराल. आत्मविश्वास वाढेल. आनंद, हर्ष व मनोरंजनावर पैसा खर्च होईल.
आजचा दिवस प्रतिकूलतेचा असून एखादा अपघात किंवा शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. शक्यतो वाद टाळावेत.
वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. पदोन्नती संभवते. मान - सन्मान होतील. वडील व वडीलधार्यांकडून लाभ होतील.
भेटवस्तू मिळाल्याने आनंद होईल. मात्र अग्नी, पाणी, अचानक आपत्ती ह्यापासून सावध राहावे लागेल. व्यावसायिक कार्यासाठी धावपळ होईल.
चोरी, अवैध काम, निषेधार्ह काम व नकारात्मक विचारां पासून दूर राहणे हितावह राहील. वाणीवर संयम ठेवावा लागेल. कुटुंबात कोणाचा तरी विवाह ठरेल.
आप्तेष्टांसह मेजवानी किंवा सहलीचे बेत आखाल. नाटक, चित्रपट, मनोरंजनाच्या ठिकाणांना भेट देऊन त्यांच्याशी जवळिक निर्माण कराल. यश व प्रसिद्धी वाढेल.