आजचे राशीभविष्य, २३ फेब्रुवारी २०२६

Todays Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

मेष- आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. सगळ्या कामात यश मिळाल्याने आपण खूप आनंदी व प्रसन्न व्हाल. आर्थिक लाभ सुद्धा होईल.

वृषभ-आज सावध राहावे लागेल. आपले मन अनेक प्रकारच्या चिंतांनी व्यग्र असेल. स्वास्थ्यही जरा नरमच राहील. विशेषतः डोळ्यांचा त्रास संभवतो. 

मिथुन- आजचा दिवस लाभदायी आहे. पत्नी व संतती कडून फायदेशीर बातम्या मिळतील. मित्रांच्या भेटी आनंद देऊन जातील. व्यापारी वर्गाच्या प्राप्तीत भर पडेल. 

कर्क- कामाच्या ठिकाणी आपले वर्चस्व वाढेल. बढतीची हमखास शक्यता आहे. कुटुंबात महत्वाच्या विषयावर चर्चा होईल. आईची तब्बेत उत्तम राहील.

सिंह- आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. उतावीळपणामुळे निर्णय घेऊन किंवा वाटचाल करून नुकसान होण्याची शक्यता आहे.

कन्या- आज नवीन कामे सुरू केल्यास त्यात अडचणी येतील. बाहेरचे खाद्य पदार्थ खाऊन स्वास्थ्य बिघडू शकते. मन रागीट होईल, म्हणून बोलण्यावर ताबा ठेवावा लागेल. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. 

तूळ- आजचा दिवस प्रणय, प्रेमालाप, मनोरंजन व मौज - मस्ती करण्याचा आहे. सार्वजनिक जीवनात महत्व मिळेल. यश व कीर्ती वाढेल. 

वृश्चिक- आज आपण निश्चिंतपणा व सुखशांतीमध्ये घरात वेळ घालवाल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य कार्य करण्यासाठी उत्साह देईल. 

धनू- आज कार्यपूर्ती न झाल्याने नैराश्य येण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.

मकर- आजचा दिवस प्रतिकूलतेचा असल्याने मन खिन्न होईल. शारीरिक स्फूर्ती, तरतरी ह्यांचा अभाव राहील. सार्वजनिक जीवनात मानहानी होण्याचा संभव आहे.

कुंभ-  आज आपण तना - मनाने प्रसन्न व्हाल. मनात असलेले चिंतेचे मळभ दूर होऊन उत्साह वाढेल. भाऊबंदांसह नवीन योजना ठरवाल. त्यांच्यासह आनंदात वेळ जाईल.

मीन- आजचा दिवस आर्थिक नियोजन करण्यासाठी अनुकूल आहे. नियोजित कामे पूर्ण होतील. प्राप्तीत वाढ होईल. कुटुंबात सुख शांतीचे वातावरण असेल.