'या' राशीच्या लोकांनी आरोग्य जपा!

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

मेष- आजच्या दिवसाचा प्रारंभ स्फूर्ती व उत्साहाने होईल. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. दुपारनंतर मात्र आरोग्याच्या तक्रारी उदभवू शकतात. 

वृषभ- द्विधा मनःस्थितीमुळे आपण असमाधानी राहाल. सर्दी, कफ, खोकला, ताप ह्यांचा उपद्रव संभवतो. धार्मिक कार्यसाठी खर्च होईल.

मिथुन- कामाचा व्याप वाढून त्याचा आपल्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे.

कर्क- आज कौटुंबिक व व्यावसायिक जीवन आनंदी राहील. कामाचा व्याप वाढल्याने प्रकृतीवर प्रतिकूल परिणाम होईल. 

सिंह- दिवसाची सुरवात शारीरिक व मानसिक अस्वस्थतेने होईल. अती संतापाने इतरांची मने दुखवाल. 

कन्या- इतरांशी वाद होऊ नयेत म्हणून आपली वाणी संयमित ठेवावी. प्रकृती नरम गरमच राहील. 

तूळ- आजच्या दिवसाची सुरुवात आनंददायी असेल. जहाल विचार आणि अधिकाराची भावना मनात राहील. 

वृश्चिक- आजचा दिवस बौद्धिक कार्य, जनसंपर्क व इतरांत मिळून- मिसळून राहण्याच्या दृष्टीने चांगला आहे. जवळचा प्रवास संभवतो. 

धनु- आज शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. कठोर परिश्रमा नंतर कामात यश मिळेल तरी निराश होऊ नका. प्रवासात अडचणी येतील. 

मकर- आज आपण फारच भावनाशील व्हाल. आपल्या भावना दुखावल्या जातील. वाहन चालवताना दक्ष राहा. 

कुंभ- आजचा दिवस महत्त्वाचा निर्णय घेण्यास अनुकूल नाही. मात्र, नवीन कार्यारंभासाठी आज दिवसाच्या सुरुवातीचा वेळ खूप अनुकूल आहे. दुपार नंतर मानसिक व्यग्रता वाढेल.

मीन- आज पैसे जास्त खर्च होतील त्यामुळे मन बेचैन होईल. मतभेद व तणाव निर्माण होऊ नयेत म्हणून आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा. आर्थिक बाबीत सावध राहा. व्यवसायात स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. 

हे ६ पदार्थ शरीराच्या २०६ हाडांना आतून मजबूत करतील

Click Here