जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...
मेष: शारीरिक थकवा जाणवेल. आज शक्यतो प्रवास टाळावा. हट्टीपणा सोडून द्यावा. पोटाच्या तक्रारी उदभवतील.
वृषभ: पैतृक संपत्ती पासून लाभ संभवतात.वडील आपणांशी खूप चांगल्या रीतीने वागतील.
मिथुन: नोकरीत वरिष्ठ अधिकार्याकडून किंवा सरकारकडून परिश्रमाचा यथोचित मोबदला मिळेल.
कर्क: आज गैरसमज व नकारात्मक व्यवहार आपल्या मनात ग्लानी निर्माण करतील. प्रकृतीचा विशेषतः डोळ्यांचा त्रास होईल.
सिंह: वडील व वडीलधार्यांचा सहवास लाभेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.
कन्या: आपल्या अहंपणामुळे आज भांडण होण्याची शक्यता आहे. शारीरिक व मानसिक चिंतेत दिवस जाईल. स्वभावातील उतावळेपणामुळे काम बिघडण्याची शक्यता आहे.
तूळ: आजचा दिवस शुभफलदायी व लाभदायी आहे. मित्रांशी भेट होऊन त्यांच्यासह फिरायला जाल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. पत्नी व संतती यांच्याकडून सुखा - समाधानाचा अनुभव येईल.
वृश्चिक: घरात आनंदाचे वातावरण राहील. प्रत्येक काम विनासायास पार पडेल. व्यापार्याना व्यापारात चांगल्या संधी प्राप्त होतील.
धनु: कामात उत्साह व आवेशाचा अभाव राहील. मन चिंतायुक्त राहील. संततीची समस्या हे त्याचे कारण असू शकते. नोकरी - व्यवसायात त्रास होईल.
मकर: आज नकारात्मक विचार प्रभावी होऊ देऊ नका. भागीदारांशी संबंध बिघडतील. अचानक प्रवास करावा लागेल.
कुंभ: आजचा दिवस प्रसन्नतेचा आहे. आपला आत्मविश्वास वाढल्याने कामात यश मिळणे सहज शक्य होईल. स्वभावातील मौजवृत्ती मनाला स्फूर्ती देईल.
मीन: मनाचा खंबीरपणा व आत्मविश्वास आपले काम यशस्वी करील. कुटुंबात सुख - शांती, आनंदाचे वातावरण राहील. राग व बोलण्याची उद्धट पद्धत यांवर संयम ठेवा.