तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय? वाचा

कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आहे खास आणि कोणत्या राशींना करावा लागणार संकटाचा सामना? वाचा

मेष: आपल्या राशी पासून चंद्र दशमात भावात असणार आहे. आज आपण आपल्या कौटुंबिक गोष्टींकडे अधिक लक्ष द्याल.

वृषभ: आज परदेशस्थ स्नेहीजनां कडून व मित्रवर्गा कडून आनंददायी बातम्या मिळाल्याने आपण आनंदित व्हाल. 

मिथुन: आज अनियंत्रित रागाला लगाम घालावा लागेल. बदनामी व नकारात्मक विचारांपासून दूर राहणे हिताचे ठरेल. खर्च अधिक झाल्याने आर्थिक चणचण भासेल.

कर्क: आज आपण मौज - मजा व मनोरंजन ह्यात गढून जाल. मित्र व कुटुंबीयांसह करमणूक केन्द्र किंवा पर्यटन स्थळी जाण्याची संधी मिळेल. 

सिंह: आज उदासीन वृत्ती व संशयाचे काळे ढग आपल्या मनाला वेढून टाकतील. 

कन्या: आजचा दिवस चिंता व उद्वेगाने भरलेला असेल. पोटाच्या त्रासामुळे प्रकृती बिघडेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येतील.

तूळ: आज आपणास अतिशय संवेदनशीलता व विचारांचे अवडंबर ह्या मुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. माता व स्त्रियांच्या बाबतीत काळजी लागून राहील.

वृश्चिक: आजचा दिवस कार्यात यश व आर्थिक लाभ मिळवून देणारा आहे. नवीन कार्याचा आरंभ करू शकता. 

धनु: आज आपल्या मनाची अवस्था द्विधा होईल. कौटुंबिक वातावरण क्लेशदायी राहील. 

मकर: आजच्या दिवसाची सुरवात मंगल वातावरणाने होईल. एखादा मांगलिक प्रसंग घडेल. कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण राहील. आपले प्रत्येक काम सहजगत्या पूर्ण होईल.

कुंभ: आज शक्यतो आर्थिक देवाण - घेवाणीचे व्यवहार करू नका. खर्चाचे प्रमाण वाढेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मिळणार नाही.

मीन: आज आपणास सामाजिक कार्यात किंवा समारंभात भाग घेण्याची संधी मिळेल. मित्र - स्नेह्यांशी सुसंवाद साधल्याने मनाला आनंद होईल. 

डिसेंबरमध्ये हनिमूनसाठी 'ही' आहेत बेस्ट ठिकाणं!

Click Here