जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...
मेष- आजचा दिवस आपणास लाभदायी आहे. व्यापार - व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढेल. दिवसभर आनंदी व खेळीमेळीचे वातावरण राहील.
वृषभ- आज आपण व्यापार वृद्धीवर आपले लक्ष केंद्रित कराल. नवीन योजना व प्रणालीच्या वापराने व्यापार प्रगतीच्या दिशेने वाढत जाईल. मात्र कामात यश मिळण्यास विलंब होईल.
मिथुन- आज मनात नकारात्मक विचार येतील, जे दूर करावे लागतील. अपघात होण्याची शक्यता असल्याने वाहन सावधपणे चालवावे. अचानकपणे खर्च वाढतील. व्यापार - व्यवसायासाठी प्रवास करावा लागेल.
कर्क- आज आपणास स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद, सुंदर वस्त्रालंकारांचा लाभ व भिन्नलिंगी व्यक्तींचा सहवास लाभल्याने आपण आनंदित व्हाल. आपली आर्थिक बाजू मजबूत होईल. मन मात्र भरकटत राहील.
सिंह- आजचा दिवस व्यापार वृद्धी करण्यास अनुकूल आहे. व्यवसायातील आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल. योग्य कारणांसाठी पैसा खर्च होईल. परदेशस्थ व्यावसायीकांमुळे लाभ संभवतात.
कन्या- आजचा दिवस सौख्यदायी आहे. अलंकार खरेदी करू शकाल. कलेत आवड निर्माण होईल. व्यापारासाठी दिवस उत्तम आहे. आर्थिक बाबी मार्गी लागतील. घरात आनंद व शांतता लाभेल.
तूळ- आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. उत्साह व आनंद यांचा अभाव राहील. कौटुंबिक वातावरण तणावयुक्त राहील. नोकरी - व्यवसायात मानहानी होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक- आज संपत्ती विषयक कामे व घरगुती प्रश्न ह्यांचे निराकरण होऊ शकेल. नोकरदारांना आजचा दिवस अनुकूल आहे. भावंडांचे सहकार्य लाभेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल.
धनु- आज आप्तांशी मतभेद संभवतात. प्रकृती उत्तम राहील. आर्थिक फायदा होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे लक्ष द्यावे लागेल. दुपार नंतर परिस्थिती अनुकूल होईल.
मकर- आज आपला कल धार्मिकतेकडे होईल. व्यापार - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल होईल. आपली सगळी कामे सहजपणे पूर्ण होतील. जीवनात आनंद वाढेल.
कुंभ- आज धार्मिक व सामाजिक कार्यासाठी खूप खर्च होईल. मित्र मंडळींशी वाद होतील. अपघात किंवा शस्त्रक्रियेची शक्यता आहे. दुपार नंतर सर्व काही सुरळीत पार पडेल.
मीन- आजचा दिवस व्यापार - व्यवसायासाठी उत्तम फलदायी आहे. विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील. प्रवास संभवतात. मित्रांकडून भेटवस्तू मिळतील. दुपार नंतर मात्र प्रत्येक काम जवाबदारीने करावे लागेल.