राशीभविष्य २९ एप्रिल २०२६

आजचा दिवस मेष, वृश्चिक आणि धनु राशीसाठी अत्यंत शुभ आहे. मात्र, कुंभ आणि तूळ राशीच्या व्यक्तींनी आज विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

मेष- आजचा दिवस आनंददायी आहे. आर्थिक लाभ झाल्याने गुंतवणुकीशी संबंधित योजना यशस्वीपणे पूर्ण होतील. व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील.

वृषभ- आज वैचारिक पातळीवर थोरपणा व गोड वाणी ह्यामुळे इतरांना प्रभावित करू शकाल. तसेच त्यांच्याशी संबंधात सुसंवाद निर्माण करू शकाल. बैठका, चर्चा ह्यात सुद्धा आपणाला यश मिळेल. 

मिथुन- आज मनाची स्थिती दोलायमान राहील. मन द्विधा बनेल. जादा हळवेपणा मनाला बेचैन करेल. आई विषयी अधिक भावनाशील व्हाल.

कर्क- शारीरिक व मानसिक उत्साहा बरोबर घरातील वातावरण सुद्धा आनंदी असेल. मित्र व स्नेहीजन ह्यांचा सहवास घडेल. मित्रां कडून लाभ होईल.

सिंह- आजचा दिवस मध्यम फलदायी असला तरी आर्थिक दृष्टया लाभदायी आहे. खर्च मात्र वाढतील. सर्वदूर असणार्‍या लोकांचे निरोप येतील व व्यवहारातून लाभ होतील. 

कन्या- आज आपल्या वैचारिक समृद्धी व मोहक वाणी ह्यामुळे लाभ होऊन सौहार्दपूर्ण संबंध वाढवून काम पूर्ण कराल. आजचा दिवस व्यवसायाच्या दृष्टीने लाभदायक आहे.

तूळ- आज आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. अविचारी वर्तनाने अडचणीत याल. एखादा अपघात संभवतो. अचानकपणे खर्चात वाढ होईल. 

वृश्चिक- आजचा दिवस लाभदायी आहे. नोकरी - व्यवसायात फायदा होईल, मित्रांचा सहवास घडेल. त्यांच्यासह निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जाण्याचे बेत ठरतील.

धनु- आज यश, कीर्ती व प्रतिष्ठा ह्यात वाढ होईल. कार्यक्षेत्रातील वरिष्ठ खूश असल्यामुळे पदोन्नतीची शक्यता आहे. स्वास्थ्य ठीक राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

मकर- आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. बौद्धिक कार्यासाठी मात्र दिवस शुभ आहे. लेखन अथवा साहित्य विषयक कार्य व्यवस्थित पार पडेल. त्यासाठी नियोजन कराल. 

कुंभ- आज आपण नकारात्मक विचारा पासून दूर राहावे. वाद, भांडणे ह्यापासून सुद्धा दूर राहावे. राग व बोलण्यावर संयम ठेवाव. कौटुंबिक वातावरण कलुशित होईल. 

मीन- आज व्यापार्‍यांना उज्ज्वल भविष्य आहे. भागीदारीसाठी अनुकूल दिवस आहे. साहित्यिक, कलाकार, कारागिर आपल्या कलेला वाव देऊ शकतील.