उपवासाव्यतिरिक्त नियमित आहारातही रताळ्यांचा समावेश केल्यास आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात.
स्टार्चने परिपूर्ण असल्यामुळे रताळ्यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. रताळ्यांमध्ये 'अ' आणि 'क' जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते.
यातील प्रोटीन इनहिबिटर या प्रथिनांत कॅन्सर पेशींच्या वाढीला थांबविण्याची क्षमता असल्याचं वैज्ञानिकांना आढळले आहे.
रताळ्यामध्ये फायबरचे प्रमाण मुबलक असल्याने वेळी-अवेळी लागणाऱ्या भुकेवर नियंत्रण मिळवणे शक्य होते.
रताळ्यामधील पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो तर कॅल्शियममुळे हाडांना मजबूती मिळते.
यात लोह असल्याने हिमोग्लोबिन वाढते. पिष्टमय पदार्थांमुळे शरीरातील अतिरिक्त मेद कमी केले जाते.