सर्वाधिक प्रथिनांचे प्रमाण असणाऱ्या डाळी

जागतिक कडधान्य दिवस दरवर्षी १० फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. सर्वाधिक प्रथिने असणाऱ्या पहिल्या ५ डाळी कोणत्या? ते पाहूया.

मसूर
प्रथिने - २५%
फायबर - खूप जास्त.
लोह व फॉलिक ॲसिड - उत्कृष्ट.
फायदे - रक्तवाढ, हृदयासाठी चांगली, लवकर शिजते.

उडीद
प्रथिने - २५%
कॅल्शियम व लोह - चांगले प्रमाण.
फायदे - स्नायू, हाडे मजबूत करतो.
शक्तिवर्धक कडधान्य.

मूग
प्रथिने - २३-२४%
व्हिटॅमिन B - समृद्ध.
फायदे - आजारी, लहान मुले व वृद्धांसाठी योग्य, सर्वाधिक हलके व पौष्टीक.
सर्वाधिक संतुलित पोषणमूल्य.

तूर
प्रथिने - २२-२४%
फायबर भरपूर - पचन सुधारते.
लोह, पोटॅशियम, B-व्हिटॅमिन्स.
रोजच्या जेवणासाठी योग्य, पोटभरपणा देते, चांगल्या दर्जाची वनस्पतीजन्य प्रथिने.

हरभरा/चणा
प्रथिने - १९-२१%
फायबर - भरपूर.
खनिजे - लोह, झिंक, मॅग्नेशियम.
फायदे - वजन नियंत्रण, मधुमेहासाठी उपयुक्त, ऊर्जा व पोटभरपणा देणारे.

Click Here