केवळ फांदी लावूनही सहज उगवणाऱ्या वनस्पती

फांदी लावून सहज येणाऱ्या आणि स्वयंपाकात उपयोगी पडणाऱ्या पाच वनस्पती

पुदिना
याची जुनी फांदी निवडून कुंडीत लावावी.
५ ते ७ दिवसात त्याला नवीन फुट येते.
याची सावलीतही चांगली वाढ होते.

गवती चहा (लेमन ग्रास)
गवती चहाची मुळासकट येणारी फांदी कुंडीत लावू शकता.
७ ते ८ दिवसात त्याला नवीन फुट येऊन नवीन पाने फुटतात.
याला सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते.

ओवा
ओव्याची पाने लावून त्याला वाढवता येते.
ह्याची नवीन फुट लगेच तयार होते.
याला जास्त पाण्याची आवश्यकता नसते.

रताळे
मोठ्या कुंडीचा किंवा ग्रो बॅगचा वापर करून त्यात वेलीचे कटिंग लावावे.
ह्याची पाने भाजीपाला म्हणून वापरतात व यापासून रताळे देखील मिळतात.

पानवेल
वेलीचे कटिंग मोठ्या कुंडीत लावावे.
ह्या वेलासाठी काही प्रमाणात सावलीची आवश्यकता असते.

Click Here